अ‍ॅग्रोवीनमध्ये आपले स्वागत आहे

Final Tiles Gallery id=1 does not exist

आमच्याबद्दल थोडक्यात 

शेतकऱ्यांच्या गरजेनुसार त्यांना परिपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी शेतीचे तांत्रिक शिक्षण घेतलेल्या उद्योजकांमार्फत आमच्या तर्फे मार्गदर्शन सेवा केंद्र २००८ साली सुरु करण्यात आले आहे. हे मार्गदर्शन सेवा केंद्र ’अ‍ॅग्रोसेल रिसर्च व डेव्हलपमेंट इन्स्टिट्युट’ अंतर्गत शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी चर्चा करुन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी चालविली जातात. शेतकऱ्यांशी असलेले हे जिव्हाळयाचे नाते शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी व त्याला आर्थिकदृष्टया समृध्द करण्यासाठीच आम्ही जोडले आहे. त्यातुनच राष्ट्राची शेती क्षेत्रात प्रगती घडवून आणल्या जाईल. शेतकऱ्यांशी असलेल्या या बांधीलकीमुळेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिनेच या ’अ‍ॅग्रोवीन फार्मर्स प्रोडयुसर कंपनी लिमिटेड’ ची स्थापना करण्यात आली आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच त्यांना उत्तमोत्तम सेवा देण्याचा कंपनीचा मुळ हेतू आहे. शेती आणि शेतीसंबंधीत क्षेत्रातील उद्योजक आणि संलग्न संस्थेच्या चार वर्षाच्या अथक परिश्रमानंतरच ’अ‍ॅग्रोवीन फार्मर्स प्रोडयुसर कंपनी लिमिटेड’ ची स्थापना करून आम्ही प्रामुख्याने शेतकऱ्यांना शेती व्यवसायात उत्तेजन देण्यासाठी आमच्या सेवा पुरवितो. राज्यातील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खानदेश आणि विदर्भात २००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांपर्यंत आमच्या सेवा पोहोचल्या आहेत. पर्यावरण संवर्धन, उच्च गुणवत्ता, दर्जेदार उत्पादने व समाधानी ग्राहक आणि त्यासाठी सातत्यपुर्ण मार्गदर्शन देण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. शेतीला काहीतरी जोड व्यवसाय असल्याशिवाय शेतीची आणि शेतकऱ्यांची प्रगती शक्य नाही. त्यामुळे आम्ही या ’अ‍ॅग्रोवीन फार्मर्स प्रोडयुसर कंपनी लिमिटेड’ ची निर्मिती करुन त्याअंतर्गत अ‍ॅग्रोवीन वेब पोर्टल सुरु करत आहोत. जेणेकरुन या अंतर्गत शेतकऱ्यांपर्यंत यशस्वी शेतकऱ्यांची यशोगाथा, शेतीला जोडव्यवसाय, राज्यसरकार-केंद्रसरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवता येतील, हा आमचा मुळ हेतू आहे.

आमच्या या वेब पेजवर पुर्णपणे शेती क्षेत्रांशी निगडीत बातम्या आणि नवनवीन उद्योग, जोडधंदे, नवीन कल्पना आम्ही आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी कटीबध्द आहोत. जेणेकरुन शेतकऱ्यांची प्रगती करण्यासाठी आमचाही हातभार लागेल. 

धन्यवाद 

आपलाच

डॉ. संजय तांबे पाटील

डिएनवायएस, एमएसडब्ल्यू, पीएचडी (कृषी)

Testimonials

Nice group