बटाटा आपल्या शरिरासाठी!

जगात तिसऱ्या क्रमांकावर सेवन करण्यात येणारे खाद्य म्हणजे बटाटा. जगात 4000 पेक्षा जास्त बटाट्याच्या प्रजाती उपलब्ध आहेत. त्यातून सुमारे 15 ते 20 प्रजाती भारतात उपलब्ध आहे. सगळ्यात जास्त कर्नाटका राज्यात बटाट्याचे उत्पादन केले जाते, त्यानंतर गुजरात, बंगाल, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, इत्यादि.

बटाट्यापासून अमर्यादित खाद्यपदार्थ बनवले जातात. जगभरातील प्रत्येक व्यक्तीला बटाट्याचा कोणता ना कोणता पदार्थ आवडतोच. वडापाव, समोसा, आलू टिक्की, फ्राईस, ट्विस्ट, इत्यादि. या शिवाय लोकप्रिय अशा पानी-पुरीत, चाट, आलू पराठे, पुरी – भाजीसाठी, इत्यादि. विदेशी पदार्थ जसे की बर्गर, फ्रेंच फ्राईस, वेजस्, चिप्स असे अमर्यादित पदार्थांमध्ये बटाट्याचे सेवन केले जाते.

100 ग्रम बटाट्यामध्ये 75% कॅलरीज असतात. याशिवाय प्रोटिन, व्हिटॅमिन सी, सोडियम, पोटॅशियम सारखे पोशक तत्व असतात

मात्र खाण्यपुरते सिमित न राहता बटाट्याला चेहऱ्यावर लावल्याने काळे ढाग नाहिसे होतात, जखमेचे ढाग नाहिसे करतात, पुरळांचे उपचार केले जातात. बटाट्याला चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्या येत नाही व तरुण त्वचा राहते. बटाट्याला दही आणि लिंबाच्या रसासोबत लावल्याने चेहऱ्यावरच्या अनेक गोष्टी बऱ्या होतात आणि चेहरा खुलतो.

अशा या बहूगुणी बटाट्याचे फायदे सर्वसामान्य लोकांना तर आहेच, या शिवाय शेतकऱ्यांना सुद्धा आहे. 12 महिने याचं उत्पादन असते मात्र भारतात हिवाळ्यात जास्त प्रमाणात उत्पादन केले जाते. बटाटा जमिनीच्या खाली उगणारा पदार्थ असला तरी भरपूर काळापर्यंत साठवून ठेवल्या जातो. तंत्रज्ञानाच्या मदतीने बटाटाच्या प्रजातींमध्ये विकास करण्यात येत आहे जेणे करून कमी जागेत जास्त उत्पन्न पोषण मिळेल व रोगांपासून मुक्त असेल.

या बाटाट्याचा एक अनोखा इतिहास देखील आहे. बटाट्याचे मुळ भारत नाही तर पेरू देशात सर्वप्रथम याची लागवड केली गेली. ही घटना सुमारे 8000 ते 5000 इसवी सन पुर्वी करण्यात आली होती. पोर्तुगालांनी या बटाट्याची लागवड सर्वप्रथम भारतात केली. भारताच्या पश्चीम किनारपट्टीवर सतराव्या शतकात बटाट्याची पहिली लागवड करण्यात आली व पोर्तुगाल याला बटाटा असे म्हणायचे. त्यानंतर इंग्रजांनी बंगालमध्ये या पिकाची लागवड अठराव्या शतकात केली. बंगालमध्ये या पिकाला आलू असे म्हटले जायचे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *