मिरची.. तिखट, झणझणीत आरोग्यदूत

हिरवीगार आणि झणझणीत, डोळ्यातून – नाकातून पाणी आणणारी हिरवी मिरची आपल्या स्वयंपाकघरात असतेच. ही हिरवी मिरची आपल्या आरोग्यसुधारणेमध्ये कसा हातभार लावते, ते पाहणेही महत्वाचे आहे.

हिरवी मिरची हे मूळ अमेरिकेतील फळ असून त्यात अ, क आदी जीवनसत्वांसोबतच कॅल्शियम, फॉस्फरस आदी खनिजेही मोठ्या प्रमाणात असतात. Capsicum frutescens असे हिरव्या मिरचीचे शास्त्रीय नाव आहे. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, ईजिप्त, स्पेन, चीन, जपान, व्हिएतनाम, ब्रह्मदेश, मलेशिया, इंडोनेशिया, पाकिस्तान या देशात मिरची लागवड केली जाते. मिरचीच्या उत्पादनाच्या बाबतीत जगात भारताचा पहिला क्रमांक आहे.

तिखट आणि झणझणीत खाण्याची आवड असलेल्यांसाठी हिरवी मिरची हा जिव्हाळ्याचा विषय असतो. हिरवी मिरची जेवणातली लज्जत वाढवण्यासोबतच एखादा पदार्थ सजवतानाही आपल्याला दत करते. पण, याच झणझणीत, डोळ्यात पाणी आणणाऱ्या हिरव्या मिरचीचे आपल्या आरोग्यालाही बरेच फायदे होतात. ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. चला तर मग.. पाहू या हिरव्या मिरचीचे आरोग्यदायी फायदे..

वजन घटवण्यासाठी उपयुक्त – हिरव्या मिरच्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण अधिक असून त्यात कॅलरी अजिबात न,तात. त्यामुळे, वजन घटवण्यासाठी मिरची फार उपयुक्त ठरते.

मधूमेहावर नियंत्रण – मधुमेहींसाठी हिरव्या मिरचीचं सेवन करणं खूपच फायद्याचं ठरतं. हिरव्या मिरच्यांमध्ये असणाऱ्या घटकांमुळे रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

मानसिक तणावावर नियंत्रण – हिरव्या मिरच्यांच्या सेवनामुळे एण्डोर्फिन नावाचं रसायन तयार होतं. यामुळे वेळोवेळी बदलणाऱ्या मानसिक स्थिती किंवा मूड स्विंगवर अधिकाधिक प्रमाणात नियंत्रण ठेवता येतं.

हाडांसाठी उपयुक्त – हाडांच्या बळकटीसाठी हिरव्या मिरचीतील अ जीवनसत्व उपयोगी ठरते. इतकेच नव्हे, तर त्यामुळे दातही मजबूत होतात.

रक्तस्त्राव थांबवण्यास उपयुक्त – एखादी जखम झाल्यावर त्यातून होणारा रक्तस्त्राव आटोक्यात आणण्यासाठी तिखट पदार्थ किंवा हिरव्या मिरच्यांचं सेवन करणं फायद्याचं ठरतं. हिरव्या मिरच्यांमध्ये व्हिटामिन के मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रक्तस्त्राव थांबवण्यास त्याची मदत होते.

कर्करोगाला प्रतिबंध – हिरव्या मिरचीत असलेल्या कॅप्सेसिन या घटकद्रव्यामुळे प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.

त्वचेला फायदेशीर – हिरव्या मिरच्यांमधील अ जीवनसत्वामुळे त्वचेचा पोत सुधारतो, त्वचा उजळ होते. तसेच, चेहऱ्यावरील पुरळ वा व्रण कमी करण्यासाठीही मिरच्या उपयुक्त ठरतात.

दम्यासाठी उपयुक्त – हिरव्या मिरचीचा रस मधामध्ये मिसळून त्याचे सेवन केल्यास दमा कमी होतो व सर्दी, खोकल्यावरही हा रामबाण उपाय ठरू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *