भारतीय डाळी आणि कडधान्य संघटनेच्या वतीने देशी आणि काबुली चण्यावर ‘द आयपीजीए ज्ञान मालिका’ वेबिनारचे आयोजन

उत्पादन, खरेदी, विक्री, किमती, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांतील ट्रेंड्स तसेच देशी आणि काबुली चण्याबाबतची धोरणे यांबाबत मिळणार माहिती

१४ ऑगस्ट २०२० रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ५ वाजता

भारतातील डाळींची विक्री आणि उद्योगातील प्रमुख संस्था असलेल्या भारतीय डाळी आणि कडधान्य संघटनेच्या (आयपीजीए) वतीने १४ ऑगस्ट २०२०, शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता  देशी आणि काबुली चणा या विषयावर ‘द आयपीजीए ज्ञान मालिका’ या मालिकेतील दुस-या वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील आणि जगभरातील केवळ डाळींच्या क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा व विश्लेषण करण्यासाठी ‘द आयपीजीए ज्ञान मालिका’ ही वेबिनारची मालिका गेल्या महिन्यात सुरू करण्यात आली आहे.

आयपीजीएने १४ ऑगस्टला होणा-या दुस-या वेबिनारसाठी चणे हा विषय निवडण्यामागे दोन कारणं आहेत. एक बाजारात आलेले रबी हंगामातील पीक आणि दुसरे कारण म्हणजे पंतप्रधान गरीब कल्याण योजना (PMGKY) या योजनेची मुदत नोव्हेंबर २०२० पर्यंत वाढवण्याचे माननीय पंतप्रधानांनी जाहीर केले आहे आणि या योजनेअंतर्गत देशातील जवळ-जवळ १८ कोटी घरांमध्ये १ किलो चणाडाळ मोफत देण्यात येणार आहे.

भारतात २०१८-१९ या वर्षात ९.९४ दशलक्ष टन डाळीचे उत्पादन करण्यात आले आहे. तिस-या अंदाजपत्रकानुसार २०१९-२० या वर्षात १०.९० दशलक्ष टन उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे. PMGKY ला दिलेल्या मुदतवाढीमुळे NAFED हमीभावत शेतक-यांकडून मोठ्या प्रमाणात चणा विकत घेईल आणि त्यानंतर येणा-या सणासुदीमुळंही चण्याला बाजारात मोठी मागणी असेल. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील चणा डाळीची किंमत ठरवण्यात वरचे सगळे घटक महत्त्वाची भूमिका बजावतील.

देशी व काबुली चणा या विषयावर १४ ऑगस्टला होणा-या वेबिनारमध्ये खाली दिलेल्या सर्व विषयांवर सखोल चर्चा होणार आहे: चण्याचे उत्पादन: भारत आणि इतर महत्त्वाची मूळ ठिकाणं. NAFED कडून होणारी खरेदी, साठवण आणि विक्रीचे धोरण, PMGKY अंतर्गत मोफत चणा वितरणाचे संदर्भ, आंतरराष्ट्रीय आणि भारतीय बाजारातील चण्याची किंमत, चणा पुरवठा आणि मागणी ट्रेंड्स, भारताचे महत्त्वाचे धोरण आणि किंमती, काबुली चणा- उत्पादन आणि निर्यात.

चणा या विषयावर १४ ऑगस्टला होणा-या आयपीजीए ज्ञान मालिकेअंतर्गत वेबिनारसाठी नोंदणी सुरू आहे, ही लिंक वापरून नोंदणी करू शकता: https://forms.gle/6Ug1yJqwsnXLmBL77

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *