चंदन लागवडीतून मिळू शकते एकरी ५ कोटी उत्पन्न 

चंदन लागवड करण्याचा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनात या पिकाविषयी नेहमी धाकधूक असते. हे पिक कायदेशीर आहे की नाही, परवानगी कोणाची घ्यायची असे अनेक प्रश्न शेतकऱ्याला पडलेले असतात.

लागवड परवानगी: चंदन लागवडी साठी कुठलीही शासकीय आणि इतर परवानगी लागत नाही. चंदनाची लागवड केल्यानंतर तलाठ्याकडून फक्त सातबारावर नोंद करून घ्यावी लागते आणि चंदनाचे झाड तोडताना फाॅरेस्ट खात्याची  परवानगी लागते. या पिकासाठी लागणारं हेक्टरी ४५००० रुपये अनुदान सरकार कडून तीन टप्प्यात मिळते. याविषयीची अधिक माहिती संबंधित तालूका कृषी अधिकारी यांच्याकडे मिळते. त्यांच्याकडे माहिती उपलब्ध नसल्यास वनऔषधी महामंडळ विभागात यासंदर्भातला जीआर उपलब्ध असतो.

जमीन: चंदन लागवडीसाठी पाण्याचा व्यवस्थित निचरा होणारी कुठलीही जमीन चालते. चंदन वनस्पती ही परोपजीवी असल्यामूळे त्यासोबत दूसरे झाड लावणे आवश्यक आहे. मिलिया-डूबिया, डाळिंब ई. झाडे चालतात. रोपांची लागवड 10×10 अंतरावर लागवड करावी लागते. मधल्या पाच फुट अंतरावर मिलीया लावावा लागतो. एकरी ४३५ चंदन आणि ४३५ मिलीया डूबिया लागतात 1×1 चा खड्डा करून त्यात कंपोस्ट टाकून रोप लावावे. ही जंगली शेती असल्याने नंतर फवारणी वा खताची गरज लागत नाही. वर्षातून दोनदा निंबोळी खत द्यावे लागते सोबतच सुरुवातीची तीन वर्षे ड्रिप पद्धतीने पाणी द्यावे लागते.

उत्पन्न: चंदनाच्या एका झाडापासून साधारणतः १२-१४ वर्षामध्ये १५-२५ किलोपर्यंत गाभा निघतो. त्याचा सरासरी भाव ७००० रुपये किलो आहे. विक्री साठी म्हैसुर सँडल आणि इतर सारख्या कंपन्यांकडून खूप मागणी आहे. परंतू मागणीच्या फक्त २% पूरवठा होतो. चंदन तेल आणि इतर प्रकारची उत्पादने घेणारा प्रक्रिया उद्योगही यातून सुरू करता येऊ शकतो. 

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *