अॅपल सायडर व्हिनेगर चे फायदे आपणास माहीत आहे का? नसेल माहित तर घ्या जाणून!

अॅपल सायडर व्हिनेगर केवळ आरोग्यासाठी फायदेशीर नाही तर हे त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये एसिटिक अॅसिड असते जे त्वचेला एक्सफोलीएट करण्यास मदत करते. याशिवाय हे ब्लॅक हेड्स काढून टाकण्यास मदत करते. हे आपल्या त्वचेतील पीएच संतुलित करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त ते मुरुम आणि कोंडा दूर करण्यासाठी फायदेशीर आहे.

उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात डोक्यात खाज सुटण्याची समस्या वाढते. याचे कारण असे आहे की, घामामुळे आणि ओलावामुळे टाळूच्या काही भागात बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संक्रमणाचा धोका वाढतो.

अॅपल साइडर व्हिनेगर टाळूचे पीएच पातळी राखण्यास मदत करते. जर आपण कोंड्याच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर आपण तेलामध्ये अॅपल साइडर व्हिनेगर मिक्स करून लावू शकता. अॅपल साइडर व्हिनेगरमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात.

जे आपले वजन कमी करण्यात मदत करतात. याशिवाय, रक्तातील साखर देखील कमी करते, ज्यामुळे मधुमेह होण्याचा धोका कमी होतो. हे व्हिनेगर आपल्या शरीरास कर्करोगापासून वाचवते आणि कर्करोगाच्या पेशी वाढण्यास प्रतिबंध करते. कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून बचाव करण्याबरोबरच तुमची रोगप्रतिकारशक्तीही वाढते. अॅपल साइडर व्हिनेगर शरीरातील आम्ल पातळी नियंत्रित करते, त्यामुळे पचनशक्ती देखील वाढते.

अॅपल सायडर व्हिनेगर शरीरास डिटॉक्स करून वजन कमी करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त हे मासिक पाळी पुढे ढकलण्याचे काम देखील करते. यासाठी एका ग्लास पाण्यात 3 ते 4 चमचे अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा आणि दिवसातून दोन ते तीन वेळा प्या. बर्‍याच अभ्यासांमध्ये असा दावा केला गेला आहे की, अॅपल सायडर व्हिनेगर पिण्यामुळे मासिक पाळी उशिरा येते. अनेकांना त्याची चव आवडत नाही. पण हा एक प्रभावी उपाय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *