या आहेत फणस प्रक्रिया उद्योगातल्या संधी 

फणस हे असे फळ आहे ज्याच्या गरापासून आणि बियांपासूनसुद्धा चविष्ट खाद्यपदार्थ आणि प्रक्रिया करून तयार करण्यात येणारे पदार्थ तयार करता येऊ शकतात. फणसाच्या गरापासून जेली, जॅम, स्क्वाश, पल्प, फणसपोळी असे चविष्ट खाद्यपदार्थ तयार करता येतात. फणस पिकण्याच्या थोडं अगोदरच्या अवस्थेत असताना त्यापासून वेफर्स, लोणचे असे दीर्घ काळापर्यंत टिकणारे पदार्थ बनवता येऊ शकतात. अशा बहूउपयोगितेमुळे वरील सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योगाला मोठी संधी आहे. 

फणसाचे पोषणदृष्ट्या अनेक फायदे आहेत. पण वजनाला जास्त आणि हाताळायला कठीण. शिवाय महाराष्ट्राच्या काही ठराविक भागातच आणि विशिष्ट हंगामातच हे फळ होत असल्याने यावर इतर फळांसारखी फारशी प्रक्रिया केली जात नाही. महाराष्ट्रातल्या कोकण किनारपट्टीवर फणसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. इतर किनारपट्टीच्या राज्यातही फणसाचे उत्पादन बऱ्या प्रमाणात होते . 

फणसाच्या प्रामुख्याने दोन जाती असून कापा आणि बरका अशी त्यांची नावे आहेत. कापा जातीच्या फणसाचे गरे कडक असतात आणि रंगाने पिवळेधम्मक असतात. बरका जातीच्या फणसाची गरे लिबलिबीत आणि रंगाला पांढरट अशी असतात. फणसाचे वजन ५ ते २५ किलोपर्यंत भरते. फणसाच्या काट्यामधल्या अंतरावरून आणि सालीच्या नरमाईवरून फळ पिकले आहे कि नाही हे कळते. 

प्रक्रिया उद्योगातील संधी-

–  फणसाच्या गरापासून जेली, जॅम, स्क्वाश, पल्प, फणसपोळी असे चविष्ट खाद्यपदार्थ तयार करता येतात.

–  फणस पिकण्याच्या थोडं अगोदरच्या अवस्थेत असताना त्यापासून वेफर्स, लोणचे असे दीर्घ काळापर्यंत टिकणारे पदार्थ बनवता येऊ शकतात  

– कच्च्या फळाची छान चवदार भाजी बनवता येते. फणसाच्या गराची वाईनही बनवली जाते. 

– फणसाच्या सालीचा उपयोग ‘पेक्टिन; बनवण्यासाठी केला जातो पेक्टिन हे जेली, जॅमसारख्या पदार्थांचा पोत टिकवण्यासाठी केला जातो. 

– फणसाची बी अनेकांना आवडते. उकडून, भाजून, पीठ करून विविध खाद्यपदार्थांमध्ये पोषणमूल्य वाढावे म्हणून वापरली जाते. 

फणस हा जगभरात नावाजलेला आणि कुपोषणावर पोषक आणि प्रभावी असा अन्नपदार्थ आहे. कुठल्याही प्राणी मात्राला न दुखावता तयार किंवा निर्मिती केल्या जाण्याऱ्या व्हेगन अन्नाला जगभरात  मागणी वाढत आहे. नेमकं हेच चित्र लक्षात घेउन व्हेगन आणि व्हेज दोन्ही गटांसाठी पूर्वापार असलेल्याप्रा झाडांपासून मिळालेल्या फणसावर कुठलीही प्रक्रिया न करता प्रोसेस करून पाकीटबंद भाज्या, वेफर्स, लोणचे बनवणे अशा तीन प्रक्रिया आम्ही करतो. यात कुठल्याही प्रकारची खते किंवा केमिकल्स झाडालाही आणि फळासाठीही प्रक्रिया करताना वापरत नाही. त्यामुळे पदार्थांचे पोषणमूल्य वाढते. या तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांमुळे फणसाला मागणी वाढत आहे. सोबतच प्रक्रिया उद्योगांनाही चालना मिळत आहे. हे उद्योग पुढे जाउन आहारामध्ये वर्षभर कधीही पाकीट उघडून खाता येईल इतक्या चांगल्या पद्धतीने प्रक्रिया केले जातात. लोणचंदेखील ६ ते ८ महिने खाता येईल या पद्धतीने टिकून राहते. सोबतच फणसापासून फणसपोळी तसेच, फणसाचे चॉकलेट्स, जेली,  जॅम निर्मिती करण्याचेही आमचे ध्येय आहे. कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता आणि जंगलामध्ये होणारे पॉलिनेशन न रोखता शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. 

नम्रता देसाई – कोकणातील कृषी उद्योजक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *