फ्रेंच फ्राईज आपण आवडीने खातो. पण, त्याचं हे नाव नेमकं कुठून आलंय ‘हे’ आपणांस माहीत आहे का? जाणून घ्या या मागचे कारण

इव्हिनिंग स्नॅक्स म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर पहिला पदार्थ कोणता येतो? समोसे, कोक की फ्रेंच फ्राईज? आजकाल कोणतंही स्नॅक्स हे फ्रेंच फ्राईजशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे अबालवृद्धांपासून हा पदार्थ साऱ्यांना ठावूक असून तो प्रचंड लोकप्रिय आहे. बटाट्याचे लांबट उभे काप करुन ते तेलात खुसखुशीत होईपर्यंत तळायचे आणि त्यावर मीठ व मिरपूड टाकायचं. बास्स, इतका साधा पदार्थ पण तो आज लोकप्रिय पदार्थांपैकी एक असल्याचं पाहायला मिळतं. आता खरं तर हे फ्रेंच फ्राईज आपण आवडीने खातो. पण, त्याचं हे नाव नेमकं कुठून आलंय किंवा हेच नाव त्याला का बरं दिलं असेल असा प्रश्न कधी तुमच्या मनात आला आहे का? नाही..मग चला जाणून घेऊयात या नावामागचा इतिहास.

पण अजून एक गंमत माहित आहे का..ज्या पदार्थाच्या नावात फ्रेंच शब्द आहे. तो पदार्थ फ्रेंचचा नक्कीच नाहीये.त्यामुळे या पदार्थामागचा इतिहास नक्कीच जाणून घेतला पाहिजे.

लोकप्रिय असलेल्या या फ्रेंच फ्राईजचा शोध पहिल्या महायुद्धानंतर लागला. विशेष म्हणजे जो देश खासकरुन चॉकलेट आणि वॉफल्ससाठी प्रसिद्ध आहे. त्या देशाने या फ्रेंच फ्राईजचा शोध लावला आहे. आता चॉकलेट आणि वॉफल्स म्हटलं तर तुम्हाला थोडक्यात हा देश कोणता याचा अंदाज आला असेल.

बटाट्यापासून तयार करण्यात येणाऱ्या या फ्रेंच फ्राईजचा शोध बेल्जिअम या देशाने लावला आहे. पहिल्या महायुद्धावेळी ब्रिटीश, कॅनडियन आणि अमेरिकन सैन्याने बेल्जिअममध्ये तळ ठोकला होता. त्यावेळी तेथील खानसाम्यांनी या सैन्याला तळलेले फ्राईज दिले आणि त्याचं नाव फ्रेंच भाषेत सांगितलं. विशेष म्हणजे त्यावेळी बेल्जिअम सैन्याची मुख्य भाषादेखील फ्रेंच होती.

दरम्यान, फ्रेंच भाषेत सांगितलेलं हे नाव लक्षात ठेवणं इंग्लंड, अमेरिका आणि कॅनडाच्या सैन्याला कठीण जात होतं. म्हणून त्यांनी या पदार्थाला फ्रेंच फ्राईज म्हणण्यास सुरुवात केली. आणि, पुढे हाच शब्द सर्वत्र वापरला जाऊ लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *