कोरोनामुळे चर्चेत आलेल्या गुळवेलीचे काय आहेत उपयोग आणि फायदे ?

सध्या कोरोनाच्या संदर्भात गुळवेल या औषधी वनस्पतीचं नाव चर्चेत आलंय. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि श्वसनसंस्थेचे विकार दूर करण्यासाठी गुळवेल प्रभावी ठरते. कोरोनाच्या निराकरणाबाबतीत गुळवेल किती परिणामकारक ठरते हे अजून सिद्ध व्हायचं बाकी आहे. असं असलं तरी कोणत्याही रोगाशी लढण्यासाठी लागणारी रोगप्रतिकारक शक्ती देण्यात गुळवेल उपयोगी वनस्पती आहे.   गुळवेल हिलाच अमृतवेल अथवा हिंदी भाषेत गिलोय, गुडुची असे म्हणतात. ही एक औषधी वनस्पती असून तिचं शास्त्रीय नाव ‘Tinospora cordifolia’, टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया असं आहे. हृदयाच्या आकाराची पाने म्हणुन कॉर्डिफोलिया हे नाव पडले . भारत, श्रीलंका, म्यानमार अशा उष्णकटिबंधीय प्रदेशांत आढळणारी ही एक वेल आहे. या वनस्पतीचे सत्त्व औषधी म्हणून वापरतात, त्याला गुळवेलसत्त्व असं संबोधतात.

पाहूया गुळवेलीचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत. 

तापावर रामबाण उपाय
कोणत्याही प्रकारच्या तापावर गुळवेल हा रामबाण उपाय आहे. म्हणूनच सर्व तापावरील औषधांमध्ये  गुळवेलीचा वापर केला जातो.

रोग प्रतिकारशक्तीत वाढ करणारी 
गुळवेल तुमच्या शरीरातील प्रतिकार क्षमता वाढवते. ज्यामुळे तुम्हाला सर्दी खोकला किंवा दुसऱ्या आजारांपासून संरक्षण मिळते. यातील हर्ब्स तुमच्या शरीराला स्वच्छ करतात. तसंच शरीराच्या इतर भागातील हानिकारक तत्वसुध्दा दूर शरीराबाहेर टाकण्यात मदत करते.

पचनास मदत करते 
मानसिक तणाव, चिंता, भीती आणि असंतुलित आहार इत्यादी गोष्टी तुमच्या पचनक्रियेवर वाईट परिणाम करत असतात. गुळवेलांमध्ये पचन आणि ताण दूर करणारे गुण आहेत. ज्यामुळे बध्दकोष्ठ, गॅस आणि इतर समस्या दूर होतात. ह्याच्या सेवनाने भूक ही वाढते. ह्यामुळे तुमच्या जीवनातील मानसिक तणाव दूर होऊन तुमचे जीवन आनंददायी होईल.  

मधुमेहासाठी वरदान
जर तुम्हाला मधुमेह आहे, तर गुळवेल हे तुमच्यासाठी वरदान आहे. कारण गुळवेलमध्ये हाइपोग्लिसीमिक अर्थात साखर कमी करणारे घटक आढळतात. ज्यामुळे रक्तदाब आणि लिपीडचा स्तर कमी होतो. गुळवेलच्या नियमित सेवनाने टाइप २ मधुमेहाच्या रुग्णांना विशेष फायदा होतो. रोज गुळवेल रस प्यायलाने साखर कमी होते.

डोळ्यांसाठी फायदेशीर 
गुळवेल ही वनस्पती डोळ्यांसाठी फायदेशीर मानली जाते. डोळ्यांच्या कोणत्याही समस्येला ही वनस्पती दूर करते आणि डोळ्यांची दृष्टी सुधारण्यात मदत करते. गुळवेल वनस्पती पाण्यात उकळून ते पाणी डोळ्याला लावल्यास डोळ्याचे सगळे आजार दूर होतात. गुळवेलाच्या वापराने चष्म्याचा नंबरसुध्दा कमी होतो. गुळवेलाच्या पानांचा रस मधात घालून डोळ्यांना लावल्यास डोळ्याचे सगळे छोटे मोठे आजार बरे होतात. आवळा आणि गुळवेलाचा रस एकत्र करून प्यायलास नजर तीक्ष्ण होते.

खोकला 
खूप दिवस खोकला जात नसल्यास गुळवेलाच्या रसाचे सेवन करावे. हा रस रोज सकाळी घेतल्यास खोकल्यापासून आराम मिळतो. हा उपाय खोकला थांबेपर्यंत करून बघावा.
सर्दी-पडसं, ताप इत्यादी आजारांमध्ये गुळवेलीच्या खोडाचा तुकडा पाण्यात उकळावा आणि ते पाणी प्यावं. ह्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि त्यामुळे अशक्त रूग्णांना वारंवार होणारी सर्दी-पडसं, ताप इ. आजार बरे होतात.आजकाल चिकन गुनियासारख्या व्हायरल तापातून बरे झाल्यावर बऱ्याच रूग्णांना महिनोमहिने गुडघेदुखीचा त्रास जाणवतो. अशा वेळी गुळवेलाच्या पानांचा काढा लाभदायी ठरतो.लहान मुलांमधील सर्दी, खोकला आणि तापात गुळवेलाच्या पानांचा रस काढून तो दोन तीन वेळा मधाबरोबर चाटण करून द्यावा. लगेच फरक पडतो.तापामुळे अशक्तपणा आल्यास तो दूर करण्यात ही गुळवेल हे गुणकारी औषध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *