आरोग्यदायी मका

सध्या पावसाळ्याच्या दिवसांत आपण शहरात असू वा गावात, आपल्याला सर्वांनाच खुणावते ते म्हणजे मक्याचे कणीस. उकडलेले मक्याचे दाणे किंवा भाजलेले कणीस चिंब पावसात खाताना काय औरच मजा येते. हा मका केवळ गंमत म्हणून खाण्यापलीकडे त्याचे आपल्या शरिराला काय फायदे होतात ते जाणून घेणेही आवश्यक आहे.

मक्याची कणसे आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असून त्यात भरपूर प्रमाणात असलेल्या तंतूमय पदार्थांमुळे तसेच, यातील मॅग्नेशियम व लोह या खनिजांमुळे स्वास्थ्य सुदृढ राखता येते. मुख्यतः पोट साफ होण्यास मदत होते. चला तर मग, पाहू या कणसाचे म्हणजेच मक्याचे आरोग्यपूर्ण फायदे..

हाडांच्या स्वास्थ्यासाठी उपयुक्त – मक्यातील मॅग्नेशियम आणि आर्यन या खनिजांमुळे हाडांना बळकटी येते. तसेच, मक्यात झिंक आणि फॉस्फरसही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे संधिवातावर यशस्वी मात करता येते.

दृष्टीदोषांवर योग्य इलाज – मका आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी फार उपयुक्त ठरत असून यातील अ जीवनसत्व आणि बीटा कॅरेटीनमुळे दृष्टी सुधारते.

शरीराला ऊर्जा मिळण्याकरिता उपयुक्त – मक्यात कर्बोदके मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शरीराला नवीन ऊर्जा मिळून ती टिकून राहण्यासाठी मदत होते. थकवा वाटत असल्यास आहारात वारंवार मका अंतर्भूत केल्यास तजेला येतो.

पित्त व वात यांसाठी रामबाण मक्याचे दाणे उकडून त्यात मीठ, तिखट व लिंबू घालून खाल्ल्यास पित्त व वात या त्रासांपासून सुटका मिळू शकते. या मिश्रणात हळदही टाकल्यास खोकल्यापासूनही दूर राहता येते.

हिमोग्लोबिन वाढीसाठी उपयुक्त – शरिरातील रक्ताचे व हिमोग्लोबिनचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मका हे पीक फार उपयुक्त ठरते. मक्यामध्ये भरपूर प्रमाणात असलेल्या लोहामुळे रक्त शुद्ध होते आणि वाढते.

दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर – मक्यात असलेल्या अण्टीऑक्सिडण्ट्समुळे दात व हिरड्यांचे आरोग्य सुधारते. विशेषतः, लहान मुलांच्या दातांची मजबुती सुधारण्यासाठी मका फायदेशीर ठरतो.

ह्रदयाच्या आरोग्य़ासाठी गुणकारी – मक्यामध्ये अण्टीऑक्सिडण्ट्स आणि बायोफ्लेमोनॉईड्स असतात. या घटकांमुळे शरिरातील कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होत असून वजन कमी होते आणि ह्रदयाचे आरोग्यही सुधारते.

बद्धकोष्ठता – मक्यामध्ये मुबलक प्रमाणात असलेल्या तंतूमय पदार्थांमुळे म्हणजेच फायबर्समुळे पोट साफ होण्यास मदत होत असून बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांना मक्यामुळे खूप आराम मिळतो.

कर्करोगाला प्रतिबंध – मक्यामुळे कर्करोगापासून बचाव करता येतो. मक्यातल्या सर्व उपयुक्त घटकांमुळे कर्करोगाविरुद्ध लढण्याची क्षमता शरिरात तयार होते व या जीवघेण्या रोगापासून बचाव करता येतो.

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *