तांदळाच्या पेजेचे आरोग्यदायी फायदे..

तांदूळ म्हटलं की आपल्याला रोजच्या जेवणातला भातच आठवत असेल तर जरा थांबाच.. तांदळाची पेजही अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक असते बरं का.. तांदूळ, पाणी, मीठ, साजूक घरगुती तूप, जिरे आदी साहित्यापासून तयार केलेली तांदळाची लाप्शी किंवा पेज आरोग्यासाठी अनेक बाबतीत वरदान ठरते.

घराघरात हमखास असलेले तांदूळ आपल्याला काही नवीन नाहीत. अगदी सहजच रोज भात जेवताना तो भात किंवा ते तांदूळ आपल्या शरिरासाठी किती उपयुक्त आहेत, याचा विचारही आपण करत नाही. तांदळाचा भात जितका पौष्टिक आणि पचायला सोपा असतो, तितकीच तांदळाची पेजही आरोग्यदायी असते. oryza sativa असे तांदळाचे शास्त्रीय नाव असून तांदळाची पेज विविध पदार्थांसोबत मिसळून प्यायल्यास भूक वाढवण्यापासून वजन नियंत्रणात ठेवण्यापर्यंत, बद्धकोष्ठतेपासून ते रक्तदाब नियंत्रणापर्यंत अनेक समस्यांमध्ये उपयुक्त ठरते. पाहू या, तांदळाच्या पेजेचे आरोग्यदायी फायदे…

 • तांदळाच्या पेजेत काळे मीठ टाकून प्यायल्यास भूक वाढते. यामुळे एकूण आरोग्य सुदृढ राहण्यास, ऊर्जा वाढण्यास मदत होते.
 • तांदळाच्या पेजेत मध मिसळून प्यायल्याने थकवा दूर होतो. यातील कर्बोदकांमुळे सकाळच्या वेळी असे मिश्रण प्यायल्यास, दिवसभरासाठी लागणारी ऊर्जा मिळवता येते व अशक्तपणा, मरगळ जाणवत नाही.
 • तांदळाची पेज व गूळ एकत्रित करून प्यायल्यास रक्ताची कमतरता दूर होते. हिमोग्लोबिन व लाल रक्तपेशींचे प्रमाण संतुलित राहते.
 • तांदळाच्या पेजेत लिंबाचा रस टाकल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. पोटात मुरडा पडणे, पोटदुखी, गॅस अशा त्रासांपासून मुक्तता मिळते. पचनक्रिया सुधारते.
 • तांदळाच्या पेजेत दही टाकून प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
 • केळ्यासोबत तांदळाची पेज जुलाब बंद होतात. तसेच, जुलाबांमुळे कमी झालेली ऊर्जाही पुन्हा पूर्ववत होण्यास मदत होते.  
 • तांदळाच्या पेजेत तूप मिसळून प्यायल्याने वजन वाढते. हडकुळ्या, अशक्त व्यक्तींना आयुर्वेदिक उपायांमध्ये हा उपचार दिला जातो.
 • संसर्गजन्य रोगांमुळे होणाऱ्या उलट्या, मळमळ असेल तर जेवणाऐवजी पेज घ्यावी. आजारपणात आलेली कमजोरी यामुळे दूर होते.
 • तांदळाचे पाणी घेतल्यास उच्च रक्तदाब कमी होतो. कारण यात पोटॅशिअम मुबलक प्रमाणात असते.
 • तांदळच्या पाण्याने चेहरा धुतल्यास चेहऱ्याची त्वचा तजेलदार होते. काळे डाग निघून जातात.
 • केसांकरिता तांदळाची पेज उत्तम टॉनिक आहे. या पेजेतील पाण्याने केस धुतल्यास कोंडा निघून जातो, केस रेशमी, चमकदार व मजबूत होतात. त्यातील रूक्षता निघून जाते. दुतोंडी केसांची समस्या दूर होते.
 • तांदळाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास कर्करोगाच्या पेशी आटोक्यात राहतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *