आरोग्यवर्धक पपई..

निसर्गात उपलब्ध असलेल्या विविध फळांमध्ये, फळभाज्यांमध्ये सत्व असते. प्रत्येक फळातील पोषणमुल्यांमुळे आपल्या आरोग्याला ठराविक फायदे पोहोचत असतात. फळांमध्ये पपई आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. पपईचा केशरी रंग डोळ्यांना जितका लोभसवाणा वाटतो, तितकीच तिची चवही स्वादिष्ट आणि तिचे गूण आरोग्यवर्धक असतात.

पपईचे शास्त्रीय नाव कॅरिका पपया (Carica Papaya) असे आहे. पचायला सहज म्हणून प्रसिद्ध असलेल्या पपईमुळे भूक आणि शक्ती वाढते. प्लीहा आणि यकृत रोगमुक्त ठेवण्यासाठी तसेच, कावीळीपासून प्रतिबंध करण्यासाठी पपईचा फार उपयोग होतो. पोटांचे विकार दूर करण्यासाठी पपईचे सेवन करणे लाभकारी असते. पपईमुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. वयानुसार दृष्टी कमी होण्याची समस्या उद्भवू नये, यासाठी पपई खाणे फायदेशीर ठरते. पपईमुळे पचनसंस्थेचे कार्य सुधारते. पपईच्या रसाने बद्धकोष्ठतेसारखे रोग दूर होतात. करपट किंवा आंबट ढेकर येणे थांबते. पोटाचे रोग, हृदयरोग, आतड्यांचे रोग दूर होतात. कच्ची किंवा पिकलेली पपई पोटासाठी चांगले असते. पपईमुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. प्रतिकारक शक्ती चांगली असल्यास कोणताही आजार झाल्यावर त्यापासून लवकरात लवकर बरे होण्यास मदत होते.

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पपईच्या पानांची भाजी करतात. पपईत अ, ब आणि ड ही जीवनसत्वे आणि कॅल्शियम, लोह ही खनिजे व मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. पपईमुळे वीर्य वाढते व इतर लैंगिक आजार दूर होतात. त्वचेचे रोग दूर होतात. जखम लवकर भरून येते. दिवसभराच्या धावपळीने आपल्याला बऱ्याचदा थकल्यासारखे जाणवते. अशावेळी वाटीभर पपईचे काप खाल्ल्यास आलेला क्षीण कमी होण्यास मदत होते. याशिवाय शरीरातील संप्रेरकांचे प्रमाण संतुलित राखण्यासही हातभार लागतो.

पपईच्या नियमित सेवनामुळे मूत्राशयाचे आजार दूर होतात. खोकल्यासोबत रक्त येत असल्यास तेही पपईमुळे थांबते. लठ्ठपणा दूर होतो. कच्च्या पपईची भाजी करून खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. तसेच, आपले सौंदर्य आबाधित ठेवण्यासाठीही पपई महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. पपईमुळे डोकेदुखीही कमी होते, किंबहुना अर्धशिशी (मायग्रेन) असल्यास पपई खाणे उचित ठरते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *