आरोग्यदायी तमालपत्र

मसाल्यामध्ये तमालपत्राचा वापर प्रामुख्याने केला जातो. मात्र या तमालपत्राचा मसाल्यांव्यतिरिक्तही आणखी फायदा होतो. यात अनेक औषधी गुण असतात. तमालपत्राचे सेवन केल्याने अनेक शारीरिक समस्यांचे निवारण होते. पाहू या तमालपत्राचे आरोग्यदायी फायदे..

थकवा जाणवत असल्यास – थकवा जाणवत असल्यास तमालपत्राचे पान जाळल्याने थकवा दूर होतो., याच्या सुगंधाने शांती मिळते. तसेच रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो – तुम्हाला वारंवार बद्धकोष्ठता, अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर तमालपत्र फायदेशीर ठरते.

दातांचा पिवळेपणा कमी होतो – तमालपत्राच्या पानांचे चूर्ण करुन त्यात संत्र्याच्या सालीची पावडर मिसळून या मिश्रणाने दात घासावेत. आठवड्यातून तीन वेळा या मिश्रणाने ब्रश करावे. यामुळे दातांचा पिवळेपणा कमी होतो.

डायबिटीजमध्ये फायदेशीर – डायबिटीजचा त्रास असल्यास तमालपत्राचे सेवन नियमित करा. यामुळे ब्लड शुगर नियंत्रित राहते.

किडनीच्या समस्येवर फायदेशीर – किडनीच्या समस्या असल्यास त्यावर तमालपत्र फायदेशीर ठरते. किडनीशी संबंधित कोणत्याही समस्या असल्यास तमालपत्र पाण्यात टाकून ते पाणी प्या. या पाण्यात कॅन्सरशी लढणारे गुण आढळतात.

दुखण्यावर आराम मिळतो – तमालपत्राचे तेल शरीराचा जो भाग दुखत असेल त्या भागावर लावल्यास त्रास कमी होतो.

मजबूत केसासाठी – केसांच्या फोलिकल्सचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी, कोंबड्याच्या उपचारासाठी ब्रूव्ह बे पानांची एक स्वच्छता प्रभावी आहे. केस गळतीसाठी बे लीफ टीचा एक उत्तम उपाय मानला जातो. तमालपत्रातील रसायने आणि अस्थिर घटक कोरडी त्वचा आणि कोंडा टाळण्यास मदत करतात.

उच्च रक्तदाब – ज्या लोकांना तणाव(हायपर टेन्शन) आणि उच्च रक्तदाबाची (ब्लड प्रेशर) समस्या असेल त्यांनी दैनंदिन जेवणात तमालपत्राचा उपयोग अवश्य करावा. विविध पदार्थांमध्ये तमालपत्राचा उपयोग शरीरासाठी फायदेशीर मानला जातो. तांबं, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह, झिंक यांचे विविध गुण यामध्ये असल्यामुळे रक्तदाबावर नियंत्रणात राहतो.

डोके शांत ठेवण्यासाठी – दिवसभर कामाची गडबड ,धावती जीवनशैली , प्रचंड तणाव यामुळे  मानवी जीवन असाह्य झाले आहे. अशा वेळेस खूप ताण येतो. दिवसाच्या शेवटी माणूस थोडासा निवांत होतो. डोके शांत ठेवण्यासाठी देखील तमालपत्राचा फार उपयोग होतो . जसे की तमालपत्र जर जाळले तर त्यांच्या धुरातून तुमचा थकवा दूर होतो. या बरोबरच तुमची रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते. हा उपाय करण्यासाठी तमालपत्र गॅसवर जाळा. हे इतके सोपे आहे. त्यातून येणाऱ्या सुगंधी वासामुळे तुम्हाला पाच मिनिटात शांत वाटेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *