कमी खर्चात उत्तम नफा देणारं एरंडी 

ज्या शेतकऱ्यांना पुरेशा पाण्या-पावसाचा पुरवठा नाही किंवा ज्या शेतकऱ्याचे पुरेसे बजेट नाही, अशा परिस्थितीतजी चांगले उत्पन्न देणारे पिक म्हणजे एरंडी. अवर्षण असलेल्या भागातही एरंडीचे पिक चांगले येते. साधारण ४०० ते ५०० मि.ली. पाऊस पडणाऱ्या भागात हे पिक उत्तमरीत्या येते. भारतात एरंडीचे पीक ६.७४ लाख हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते व त्यापासून ८.९९ लाख मेट्रीक टन उत्पादन मिळते. महाराष्ट्रात एरंडीचे क्षेत्र ९००० हेक्टर असून त्यापासून मिळणारे उत्पादन २००० मेट्रीक टन आहे.

एरंडी हे पीक जिरायती तसेच बागायती क्षेत्रात घेतले चांगल्याप्रकारे घेतल्या जाऊ शकते. या पिकाचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे कोरडवाहू म्हणून घेतलेली एरंडी शेताच्या बांधावर तसेच बागायती क्षेत्रात ऊस, मिरची, वांगी, केळी इ. मुख्य पिकाभोवती सहज घेता येते. या पिकाला जमिनीची खोली फार लागत नाही. हे पीक हलक्या आणि मध्यम खोलीच्या जमिनीत सलगपणे घेता येते.

एरंडी  पिकाची मुळे जमिनीत खोलवर जातात आणि जमिनीतून पोषणद्रव्ये आणि ओलावा शोषून घेतात त्यामुळे हे पीक अवर्षण भागासाठी योग्य आहे. हे पीक सर्वसाधारणपणे लागवडीखाली असलेल्या सर्व प्रकारच्या जमिनीत येऊ शकते. या सर्व बाबींचा विचार केल्यास एरंडीची लागवड करणे फायदेशीर आहे.

एरंडीचे उपयोग : एरंडी तेलाचा उपयोग औषधी व घरगुती वापराशिवाय वंगण, रंग साबण इत्यादी उद्योगात केला जातो. औद्योगिकदृष्ट्या विकसित राष्ट्रांकडून एरंडी तेलास फार मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. तसेच तेल काढल्यावर राहिलेल्या पेंडीचा उपयोग सेंद्रिय खत म्हणून केला जात असल्याने तिला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *