कांद्याचे नुकसान अर्ध्याने कमी करणारे टाटा स्टीलचे स्मार्ट वेअरहाऊस ‘ऍग्रोनेस्ट’

कांद्याचे नुकसान होण्याचे प्रमाण सध्यापेक्षा अर्ध्याने कमी व्हावे यासाठी टाटा स्टीलच्या मॉड्युलर कन्स्ट्रक्शन सुविधांचा ब्रँड ‘नेस्ट-इन’ने कांद्याच्या साठवणुकीसाठी ऍग्रोनेस्ट ही अनोखी सुविधा तयार केली आहे. शास्त्रोक्त अभ्यासाचा आधार, नवनवीन सुविधा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कांद्यांसाठी विकसित करण्यात आलेले हे अशाप्रकारचे पहिलेच स्मार्ट वेअरहाऊस आहे. शास्त्रोक्त साठवणूक पद्धतींचा अभाव, स्टॅंडर्ड नसलेली डिझाईन्स आणि खराब दर्जाच्या साहित्याचा वापर यामुळे कांद्याच्या साठवणुकीमध्ये वेअरहाऊसच्या आतच ४०% पेक्षा जास्त कांद्याचे नुकसान होते. बेभरवशाचे हवामान, वातावरणात सतत होणारे बदल आणि सध्याच्या काळात वाहतुकीमधील अडथळे व आव्हाने यामुळे शेतकऱ्यांना कांदा साठवून ठेवण्यात अनंत अडचणींना सामोरे जावे लागते, उत्पादन चांगल्या अवस्थेमध्ये फार काळ साठवून ठेवता येत नाही. कांद्यांसाठी योग्य साठवणूक सुविधा उपलब्ध नसल्याने गेल्या अनेक वर्षात शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनांचा दर्जा व प्रमाण यामध्ये खूप नुकसान सोसले आहे.

देशाची ७०% लोकसंख्या शेती क्षेत्रावर अवलंबून आहे, सकल राष्ट्रीय उत्पादनात शेती उद्योगाचे योगदान ५०% आहे.  त्यामुळे सरकार शेती उत्पादक संघटनांमध्ये (एफपीओ) वेगाने गुंतवणूक करत आहे.  टाटा स्टीलच्या इनोव्हेन्ट टीमने या बाजारपेठेतील रिकाम्या जागा नेमक्या हेरून शेतीसाठी पायाभूत सोयीसुविधा तयार केल्या आहेत. जास्तीत जास्त हवा खेळती राहील असे अतिशय अनोखे साचेबद्ध डिझाईन असून जागा विशाल आहे, त्यामुळे कांदे दीर्घकाळ आणि सुरक्षित पद्धतीने साठवून ठेवता येतील.  कांद्यांचे नुकसान कमीत कमी होईल हे सुनिश्चित करून खर्चाला प्रभावी ठरवणारे वातावरण यामुळे निर्माण करता येईल.  या वेअरहाऊसमध्ये सेन्सर्स लावण्यात आले आहेत, ज्यामुळे आतील तापमान, आर्द्रता आणि वायू यांच्यावर निगराणी ठेवता येते, त्यामुळे कांदे जर खराब होण्याजोगे वातावरण निर्माण होत असेल तर ते आधीच ओळखता येते.

टाटा स्टीलचे सर्व्हिसेस आणि सोल्युशन्स विभागाचे चीफ श्री. पी आनंद यांनी सांगितले, “आम्ही असे मानतो की भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी शेतीमध्ये स्वावलंबन व स्वयंपूर्णता मिळवता येणे महत्त्वाचे आहे.  या अभियानाने प्रेरित होऊन आमच्या तज्ञांनी शेती क्षेत्रासाठी अशा सुविधा तयार केल्या आहेत ज्या उपयोगानुसार वापरता येऊ शकतील. वातावरणातील बदल आणि पर्यावरण यामुळे शेती उत्पादने फार काळ साठवून ठेवता येत नाहीत, साठवणुकीच्या योग्य सुविधा नसल्यामुळे त्यांना खूप मोठे नुकसान सोसावे लागते.  ही समस्या लक्षात घेऊन आमच्या टीम्सनी एक अशी सुविधा तयार केली आहे जी दीर्घकाळ पर्यंत वापरता येईल व व्यवहार्य आहे.  आमच्या ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण उत्पादने व सुविधा तयार करून त्यांना उज्वल भविष्याच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *