लॉकडाऊनमध्ये विकार अनेक, उपाय एक: हळद

सध्या कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात बाहेर पडणे आणि त्यातही छोट्या आजाराने आजारी पडून गर्दीत डॉक्टरकडे जाणे हे धोकादायक ठरू शकते. वातावरण बदलामुळे घशाची खवखव, दम्याचा विकार बळावणे पोटदुखी किंवा अगदी एखादा विषारी कीटकही चावला तरी  उपचारासाठी बाहेर पडण्याची गरज नाही. मग अगदी लहानग्यांना धरपडून झालेली जखम असो वा ज्येष्ठांना झालेला मधुमेह, या सर्वांवर उपाय एकच तो म्हणजे हळद. पाहूया तर कुठकुठल्या विकारावर हळद उपकारक आहे ते.  

घशाची खवखव : घशामध्ये खवखव, टॉन्सिल्सला सूज आल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी अर्धा कप गरम दुधात अर्धा चमचा हळद मिसळून प्या किंवा एक कप गरम दूध प्या, पण गार पाणी पिऊ नका.

दमा : दम्याचा अ‍ॅटॅक आल्यानंतर पाच ग्रॅम हळद पाव लिटर पाण्यात मिसळून पिण्याने फायदा होतो.

पोटदुखी : दही किंवा ताकात हळद मिसळून पिण्याने पोटदुखी नाहिशी होते. दही किंवा ताक पोटाला साफ करते. तर हळद पचन क्रिया ठिक करते.

विषारी किडा चावल्यास : हळद वाटून, त्यामध्ये लिंबाचा रस मिसळून याचा लेप चावलेल्या ठिकाणी लावल्यास विषाचा प्रभाव कमी होतो.

मधुमेह : बारा ग्रॅम मधात तीन ग्रॅम हळद मिसळून थोडं चाटण्याने फायदा होतो. हा उपाय तीन महिने करा त्याचबरोबर दोन कारल्याचा रसही प्या. आजार दूर होण्यास मदत होईल.

हिरड्या खराब होणे : अर्धा चमचा हळद, पाव चमचा मीठ आणि ४-५ थेंब सरसोचं तेल मिसळून हिरड्यांवर त्याचा लेप लावावा. यामुळे दात आणि हिरड्या कधी दुखत नाहीत.

नेत्र दोषात : डोळ्यांच्या दोषात एक चमचा हळद दोन कप पाणी घालून उकळून घ्या. अर्ध पाणी राहिपर्यंत उकळू द्या. त्यानंतर हे मिश्रण कापडाच्या सहाय्याने गाळून घ्या. ड्रॉपरने दोन थेंब डोळ्यात टाकण्याने नेत्र दोष दूर होतात.

वाहणारे रक्त रोखते : काही लागल्यानंतर जर रक्त वाहत असेल तर रक्त थांबविण्यासाठी थोडी हळद घालावी, रक्त थांबतं.

कानात पू : हळदीत शुद्ध सरसोचं तेल मिसळून गरम करून बाटलीत भरून ठेवा. दिवसातून दोन-तीन वेळा कानात घाला. हा उपाय पंधरा दिवस करण्याने फायदा दिसेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *