लिची ‘हे’ फळ आरोग्यासाठी हानिकारक, आताच व्हा सावध; जाणून घ्या काय आहेत तोटे

उन्हाळ्याच्या (Summer) दिवसांमध्ये आंबा, ताडगोळे, फणस या फळांसोबत आवर्जुन खाल्लं जाणारं फळ म्हणजे लिची (Lychee). गुलाबी रंगाचं पाणीदारहे चवीच्या बाबतीत अनेक फळांवर मात देतं. लिचीला आयुर्वेदातही प्रचंड महत्त्व असून अनेक आजारांमध्ये त्याचा औषध म्हणून वापर केला जातो. खासकरुन खोकला, ताप, अंगदुखी अशा अनेक समस्यांवर लिची गुणकारी आहे. विशेष म्हणजे लिचीमध्ये अँटी ऑक्सिडेंटचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही लिची महत्त्वाची भूमिका पार पाडते. परंतु, विविध आजारांवर रामबाण उपाय ठरणारी लिची अनेकांसाठी त्रासदायकही ठरते. लिचीमुळे अनेकांना अॅलर्जी किंवा साईड इफेक्ट्स होण्याची शक्यता असते.

◆गरोदर व स्तनपान करणाऱ्या स्त्रिया-
गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी चुकूनही लिची खाऊ नये असं म्हटलं जातं. अशा स्त्रियांना लिची खाल्ल्यामुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळे गरोदर किंवा स्तनपान करणाऱ्या मातांनी लिची खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

◆अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता –
ज्या व्यक्तींना सूर्यफुलाच्या बिया, बर्च किंवा तत्सम प्रकारात मोडणाऱ्या झाडं, वनस्पतींची अॅलर्जी आहे. त्यांनी लिचीचं सेवन करु नये. अशा व्यक्तींना लिचीचीदेखील अॅलर्जी होऊ शकते.

◆auto immune disease –
जर तुम्हाला auto immune disease सारख्या मल्टीपल स्केलेरोसिस (एमएस), ल्यूपस (सिस्टमिक ल्यूपस एरिथेमेटोसस, एसएलई) या समस्येने त्रस्त असाल तर लिची खाऊ नका. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती दुप्पटीने वाढू शकते आणि ऑटो-इम्यून समस्या वाढण्याचं प्रमाणही वाढू शकतं.

◆मधुमेहींनी लिचीला ठेवा दूर –
ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्यांनी लिचीपासून दूर रहावं. रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करण्याची क्षमता लिचीमध्ये असते. त्यामुळे जर तुम्हाला मधुमेह असले तर रक्तातील साखर जास्त प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.

◆शस्त्रक्रिया झाली असेल तर लिची नकोच-
जर तुमची एखादी शस्त्रक्रिया झाली असेल तर जवळपास २ आठवडे लिचीपासून लांब रहा. लिचीमुळे रक्तातील साखर कमी होते. त्यामुळे जर तुमची शस्त्रक्रिया झाली असेल तर लिचीमुळे तुमची ब्लड शुगर कमी होऊन नवीन समस्या उद्भवू शकते.

◆कमी रक्तदाबाची समस्या –
खरं तर लिची हायपरटेन्शन, ताण, श्वसनासंबंधी समस्या यांवर गुणकारी आहे. मात्र, प्रमाणापेक्षा जास्त सेवन केलं तर ती त्रासदायक ठरु शकते. जास्त प्रमाणात लिची खाल्ली तर लो ब्लडप्रेशरचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे थकवा, अशक्तपणा, बेशुद्ध होणे अशाही समस्या निर्माण होऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *