रोगप्रतिकाराचा नैसर्गिक मार्ग…

कोरोनाकाळात औषध-गोळ्यांच्या मदतीने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापेक्षा निसर्गाने भरभरून दिलेल्या फळांमध्ये व भाज्यांमध्येच दडलेले काही गुणधर्म यासाठी जाणून घेण्याची नितांत गरज आहे. आयुर्वेदात तसेच निसर्गोपचारात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व टिकवण्यासाठी फळे-भाज्यांना अनन्यसाधारण महत्व देण्यात आले आहे.

सध्या कोरोनाकाळात बाकी कोणत्याही गोष्टीपेक्षा आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. शरिराची प्रतिकारशक्ती अधिक असेल तर कोरोनाच काय पण कोणताही इतर रोग आपल्याला शिवूही शकणार नाही. पण डॉक्टरांकडे जाऊन त्यांनी दिलेल्या कडू औषध-गोळ्यांच्या सहाय्याने प्रतिकारशक्ती वाढवण्यापेक्षा निसर्गानेच यासाठी आपल्याला दिलेल्या वनौषधींचा वापर केल्यास त्याचे आपल्या शरिरावर साईड इफेक्ट्ससुद्धा होणार नाहीत.

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीचे पहिले पाऊल हे आपण आपल्या हक्काच्या स्वयंपाकघरात टाकू शकतो. अशा अनेक भाज्या-फळे आहेत, ज्यामुळे विविध रोगांशी लढण्याची आपल्या शरिराची ताकद वाढवण्यासाठी आपल्याला मदत होते. क जीवनसत्व मुबलक प्रमाणात असलेल्या सर्वच पदार्थांमुळे, भाज्या व फळांमुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते आणि ऐकूणच आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. लिंबू वर्गातल्या आंबट-गोड फळांमध्ये क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळते. क जीवनसत्व मुबलक प्रमाणात असल्यावर आपले शरीर पांढऱ्या रक्तपेशी तयार करते व रोगांशी लढण्यासाठी आपल्याला ताकद मिळते.

लिंबू, मोसंबं, संत्र, आवळा आणि द्राक्षे या पाच प्रमुख फळांमध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे या फळांच्या नियमित सेवनामुळे शरिराची रोगप्रतिकारकशक्ती पुरेशी राहते व सर्व प्रकारच्या रोगांपासून आपला बचाव होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे, पपईमध्येही रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्म असून पपईतील पोटशियम आणि ब जीवनसत्वामुळे आपण अधिक काळ ऊर्जापूर्ण राहू शकतो. या फळांमध्ये अत्यल्प कॅलोरिज असल्यामुळे रोगप्रतिकारशक्तीसोबतच वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही फळे उपयुक्त ठरतात. लिंबामुळे तर अनेक आजारांपासून अत्यंत सोप्या पद्धतीने आपला बचाव होऊ शकतो. गरम पाण्यात लिंबू पिळून रोज सकाळी ते पाणी प्यायल्यास पोटही साफ होते व पित्ताचा त्रासही कमी होतो.

फळांसोबतच काही भाज्यांमध्येही ही बचावप्रणाली निसर्गतः असते. आहारात पालकाचा समावेश केल्यास त्यातील क जीवनसत्व व अण्टीऑक्सिडण्ट्समुळे पालक प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतो. पालकाची भाजी, पालकाचे सूप, पालक पराठे, पालकाची भजी अशा विविध रेसिपींच्या रूपात आपण पालकाचे सेवन नियमित करू शकतो. यामुळे पोटही साफ होते आणि पचनशक्तीही सुधारते. तसेच, रोजच्या जेवणात आल्याचा वापर केल्यासही प्रतिकारशक्तीमध्ये खूप फरक पडू शकतो. शिवाय, आल्यामुळे शरिरातील कोलेस्टेरॉल कमी होऊन वजन नियंत्रणात यायलाही मदत होऊ शकते.

बदामामध्ये ई जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बदामासारख्या सुक्या मेव्यामुळे रोगांपासून बचाव करणे सहज शक्य होते. रोज रात्री गरम पाण्यात पदाम भिजवून सकाळी ते पाणी व बदाम खाल्यास त्याचा नक्कीच फायदा दिसून येतो. आहारात रोज दही खाल्ल्यास त्यामुळे ड जीवनसत्वाची कमतरता भासत नाही व प्रतिकारशक्तीही सुधारते.

चला तर मग, कोरोनापासून स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी प्रतिकारशक्ती सुधारू या. आहारात फळे, भाज्या यांचा अधिकाधिक समावेश करून कोरोनाला हरवू या.

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *