रक्षाबंधन तर सगळेच करतात पण पर्यावरणाप्रती रक्षणाची जाणीव ठेवून पारंपरिक रक्षाबंधनाच्याही पुढे जात या पर्यावरण प्रेमींनी पर्यावरण रक्षक बनत अनोखे पाऊल उचलले आहे. येऊर एन्व्हायरमेंट सोसायटीच्या च्या कार्यकर्त्यांनी सामाजिक भान राखत येऊरच्या जंगलात वृक्षाबंधनाचा पर्यावरणाची जाणीव ठेवणारा आगळावेगळा उपक्रम राबवला आहे.
येऊर एन्व्हायरमेंट सोसायटी समन्वयक रोहित जोशी याविषयी म्हणतात की, ‘वृक्षाबंधनाचा हेतू मुळात असा आहे की, आज जसे बहीण भावाला राखी बांधून माझं रक्षण कर असं सांगते, नेमक्या तशाचप्रकारे वृक्षाबंधन करून पर्यावरणाला आणि जीवसृष्टीला आम्ही कटिबद्ध आहोत. याकरता प्रतीकात्मकरीत्या आम्ही वृक्षाबंधन करतो. आज पहिल्यांदा येऊर एन्व्हायरमेंटल सोसायटी या आम्ही फोटोग्राफर मित्रांनी मिळून सुरू केलेल्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम करतोय.
‘नुकतीच आम्ही ग्रीन गटारी साजरी केली त्याच्या पुढचं पाऊल म्हणून येऊन एन्व्हायरमेंटल सोसायटीच्या या मोजक्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवला आहे. आताच्या पर्यावरणाचे जे ज्वलंत विषय आहेत त्यांना लक्षात घेऊन सेव्ह येऊर ,सेव्हआरे, सेव्ह ईआयए हे विषय दाखवण्याचा आणि त्यावर जनजागृती करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. सोबतच बिबट्या (वाघोबा) ज्याला जंगलातले आदिवासी देव मानतात, त्याचा हा नैसर्गिक अधिवास आहे. तो संरक्षित रहावा किंवा त्यावर त्याचा नैसर्गिक अधिवास सोडण्याची वेळ येऊ नये म्हणून आम्ही आज हे जनतेला आणि आणि सोबत सरकारला प्रबोधन आणि आवाहन करण्यासाठी आलेलो आहोत. कृपा करून तूम्ही पर्यावरणाचा ऱ्हास करू नका आणि सर्वांना एकोप्याने आणि मांगल्याने एकत्र राहायची संधी मिळू द्या.’