पश्चिम घाटाचं रूप जपणारं राई निसर्ग पर्यटन केंद्र

जगातील सर्वात समृद्ध निसर्ग कुठे असेल तो म्हणजे आपल्या कोकणात. जैवविविधतेचा वारसा लाभलेल्या पश्चिम घाटात विविध झाडे, शेकडो फुले, फळे, शेकडो प्रकारचे पक्षी, प्राणी आढळून येतात. शेतीसोबतच पर्यटनवाढीकडे लक्ष दिल्यास सर्वाचा कोकणचा विकास आणि पर्यायाने स्थानिकाचाही विकास साधला जाईल.  पर्यटना साठी भरपूर उपयोग करून घेता येईल अशी जगातली सर्वात मोठी निसर्ग समृद्धी पहायला जगभरातून पर्यटक कोकणात येऊ शकतील इतकी क्षमता कोकणात आहे. नेमकी हीच क्षमता हॉटेल व्यवसायात असलेल्या अमोल लोध यांनी ओळखून त्यांची कल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. 

सुप्रसिद्ध हॉटेल ड्राईव्ह इन चे मालक लोध यांनी गोळवली संगमेश्वर या गावात सह्याद्रीच्या निसर्ग समृद्धीचे म्युझियम उभे केले आहे. हे निसर्ग पर्यटन बांधताना आपल्या ७ एकर जागे मधील एकही झाड अमोल यांनी तोडले नाही, आंबा,  काजू नारळ अशा व्यापारी पिकांच्या मागें लागता शेकडो प्रकारची झाडे यांचे त्यांनी संवर्धन केली, रायवळ आंबा काजू फणस ऐन, किंजळ, वड, कुडा, करवंद, अळू, खैर अशी असंख्य झाडे-झुडपे फळझाडे त्यांनी जपली आणि यातून एक समृद्ध जंगल विकसित झाले. या निसर्ग रचनेमध्ये कोणतीही ढवळाढवळ न करता त्यांनी कोकणातील घरांसारख्या दिसणाऱ्या निवास व्यवस्था, अतिशय साधे तंबू उभारले. पर्यटनात कोणताही चकचकीतपणा  आणता अत्यंत साधे पण आतून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा त्यांनी या आपल्या जंगल पर्यटन केंद्रात उभारल्या आहेत. 

या संकल्पनेविषयी विचारलं असता अमोल म्हणतात, ‘मित्रांशी गप्पा मारताना असं जाणवलं की बहुतेक जणांना असं वाटतं की निसर्गात आपलं म्हणून एक हक्काचं ठिकाण असावं. कशासाठी ? आरामासाठी ? नुसताच आराम नाही, या शहरीकरणात जीव घुसमटतो, स्वतःकडे पहायलाही वेळ मिळत नाही आणि वेळ मिळालाच तर ठिकाण मिळत नाही. माझ्या सर्व मित्रांना तो वेळ मिळावा व एक हक्काचे ठिकाण असावे असं वाटलं त्यातून हा उपक्रम अस्तित्वात आला. (क्रमश)


अमोल लोध, राई निसर्ग पर्यटन केंद्र
 गोळवली, तालुका संगमेश्वर+91 98221 18855

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *