साताऱ्यातील पर्यावरण रक्षक रोहित-रक्षिता संयुक्त राष्ट्राच्या नामवंत लोकांच्या यादीत

 

UN75 विश्वशांती अभियानांतर्गत ‘पर्यावरण संरक्षण व दुष्काळमुक्ती’ क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रक्षक सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातील वनरक्षिता प्रकल्पाचे युवा पर्यावरण रोहित बनसोडे व रक्षीता बनसोडे (मु.पो. गोंदवले खुर्द) यांचे नाव जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्र संघटनेत नामवंत लोकांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. यंदा युनायटेड नेशन्स आंतरराष्ट्रीय संस्था ७५व्या वर्षात पदार्पण करत आहे.

वर्ल्ड पीस एम्बेसेडर विश्वशांती दूत डॉ सुधीर तारे यांनी हि माहिती मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलताना जाहीर केली आहे. डॉ सुधीर तारे यांचे  मार्गदर्शन व जागतिक पातळीवरील सखोल अभ्यासपूर्ण अनुभव वनरक्षीता प्रोजेक्ट साठी मोलाचा ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *