शेतक-यांसोबत कौशल्य आदान-प्रदानासाठी नेटाफिमचा समाजमाध्यमांतून थेट संवाद

डिजिटल क्रांती व कमी खर्चाच्या डिजिटल साधनांचा लाभ घेत शेतक-यांशी विविध प्लॅटफॉर्म्स आणि फॉरमॅट्समार्फत संवाद साधण्याच्या उद्देशाने नेटाफिम कृषी संवाद, नेटाफिम की पाठशाला आणि नेटाफिम टिप ऑफ द डे हे उपक्रम सुरू केले आहेत. नेटाफिम इंडिया ही नेटाफिमची संपूर्ण मालकी असलेल्या उपकंपनी शाश्वत उत्पादकतेसाठी आधुनिक सिंचन उत्पादने देणारी आघाडीची जागतिक कंपनी आहे. कोविड-१९ साथीमुळे प्रत्यक्ष संपर्कावर मर्यादा आलेल्या असताना, ऑडिओ, टेक्स्ट आणि व्हिडिओ मेसेजिंगसारखी माहितीचे आदानप्रदान करणारी डिजिटल साधने, शेतक-यांपर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवण्यात अत्यंत प्रभावी ठरत आहेत. कंपनीने अत्यावश्यक पेरणीपूर्व बाबींशी संबंधित सल्लागार सेवेच्या माध्यमातून आत्तापर्यंत देशभरातील ८.५ दशलक्ष शेतक-यांचा एक समुदाय तयार केला आहे. गेल्या ६० दिवसांच्या ऑनलाइन संवादातून नेटाफिमने त्यांच्या सोशल मीडिया साइट्सवर सुमारे ९,५७६ सदस्य प्राप्त केले आहेत.

कंपनीच्या कृषीशास्त्रज्ञांनी नेटाफिम कृषी संवाद या बहुभाषिक वेबिनार्सच्या मालिकेद्वारे शेतक-यांशी संवाद साधून आणि संभाव्य विस्तारीकरणासाठी यशोगाथांची उदाहरणे त्यांच्यापुढे ठेवून नवीन कल्पना स्पष्ट करत आहेत. फेसबुकसारख्या सर्वांत लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून, शेतक-यांना कापूस, हळद व केळीचे उत्पादन वाढवण्याकरिता ठिबक सिंचन प्रणालींच्या लाभांबद्दल शिक्षित करण्यात येत आहे. प्रत्येक पीकचक्रासाठी जमिनीच्या मशागतीपासून सुरुवात करून पेरणी,  ठिबक सिंचन संचाची निवड व पाण्याचे व्यवस्थापन ते खत वापर या सर्व विषयांवर ज्ञानाधारित मालिकांमधून मुद्देसुद  माहिती देण्यात येत आहे. तसेच सुक्ष्म-सिंचनाचे फायदे, शेतक-यांची जमीन व त्याचा वापर यांच्या आधारे उत्पादनांची निवड या विषयांवर प्रख्यात कृषीशास्त्रज्ञांनी घेतलेल्या सत्रांचाही यात समावेश आहे. लाइव्ह सादरीकरणांसह प्रस्तुत शैक्षणिक मालिकेमुळे शेतक-यांना किमान हस्तक्षेपासह पीक उत्पादन यंत्रणा चालवणे अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यात मदत होत आहे.  याशिवाय, हे अधिक संवादात्मक तसेच रोचक व्हावे म्हणून कंपनीने नेटाफिम की पाठशाला या उपक्रमाच्या माध्यमातून यूट्यूबवर व्हिडिओंची मालिका सुरू केली असून या मालिकेतून आधुनिक ठिबक सिंचन प्रणालींच्या फायद्यांबाबत सखोल ज्ञान शेतक-यांना देण्यात येत आहे.

नेटाफिम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रणधीर चौहान या उपक्रमाबद्दल म्हणतात की, “नेटाफिम इंडिया कायमच भारतीय शेतक-यांची सांस्कृतिक मानववंशशास्त्रज्ञ म्हणून काम करत राहिली आहे. हे उपक्रम कार्यान्वित करण्यापूर्वी आम्ही आमचे प्रेक्षक डिजिटल प्लॅटफॉर्म्स कसे वापरतात याचे परीक्षण केले, जेणेकरून आम्ही त्यांच्यापर्यंत सहज पोहोचेल असा कण्टेंट डिझाइन करू शकू आणि त्यांच्याशी संवाद साधणे सोपे होईल. आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या सर्वव्यापी लाभांमुळे एतद्देशीय पद्धतींनी समृद्ध व स्थानिक संदर्भांनी युक्त असे शास्त्रशुद्ध ज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचवणे शक्य झाले आहे. ऑनलाइन वापरकर्त्यांची संख्या वाढल्याचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी आम्ही दुर्गम भागातील शेतक-यांना विविध पिकांविषयीचा महत्त्वाचा सल्ला योग्य वेळी व त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे.”

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *