पालक.. तब्येतीसाठी उत्तम पालेभाजी

पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे असतात. त्यामुळे, पालेभाज्या आरोग्याच्या दृष्टीने फारच उपयुक्त आहे. पालक या पालेभाजीत अनेक जीवनसत्वे व खनिजे असल्यामुळे आपल्या स्वास्थ्यासाठी पालक प्रचंड फायदेशीर ठरतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी पालेभाजीचे सेवन करणे हितावह ठरते.

पालक या पालेभाजीमध्ये शारीरिक विकासासाठी लागणारी सर्व पोषकतत्वे असतात. खनिजे, जीवनसत्वे आणि अनेक पोषकतत्वांनी बहरलेला पालक म्हणजे एक सुपरफूड आहे. पालकामध्ये अ, क, ई, के आणि ब कॉम्पेलक्स मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय मँगनीज, कॅरोटीन, आर्यन, आयोडिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम, फॉस्फरस आणि आवश्यक अमिनो आम्लही असते. अशी ही बहुगुणी पालेभाजी आपल्या आरोग्याला किती आणि कशी फायदेशीर ठरते पाहू या –

हिमोग्लोबिन वाढते – पालकामध्ये हिमोग्लोबिन वाढवणारे घटक असतात. त्यामुळे, रक्ताचे व हिमोग्लोबिनचे प्रमाण सुधाण्यासाठी व रक्त शुद्ध होण्यासाठी पालक फायदेशीर ठरतो.

स्मरणशक्ती वाढते – पालकातील कॅल्शियमने वाढीच्या वयातील मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना ऊर्जाहाडांची झीज रोखता येते व स्मरणशक्तीही सुधारते.

गरोदरपणात फायदेशीर – गर्भवती महिलांसाठी पालक म्हणजे वरदानच होय. गर्भवती स्त्रीला आवश्यक असणाऱ्या बहुतांश पोषक घटकांची गरज पालकाच्या सेवनाने पूर्ण होते. त्यामुळे, गर्भार स्त्रियांच्या शरीरात दुधाची वाढ करण्यासाठीदेखील पालकाचे सेवन फायदेशीर ठरते.

त्वचेसाठी उपयुक्त – त्वचेसंदर्भातील समस्यांवर पालकाच्या ज्यूसचे सेवन करणे हा रामबाण इलाज आहे. यामुळे त्वचा तजेलदार आणि उजळ राहते. या ज्यूसमुळे केसांचे आरोग्यदेखील चांगले राहण्यास मदत होते.

उष्णता कमी होते – शरिरातील उष्णता कमी करण्यासाठी पालक ही फार उपायकारक भाजी आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्यात आपल्या शरिराला थंड ठेवण्याचे काम पालक करतो. उन्हाळ्यात पालकाचे पराठे, ज्यूस, कोशिंबीर आदी पदार्थ खाल्लेले फायदेशीर ठरतात.

मधूमेहावर उपयुक्त – मधूमेहाच्या रुग्णांनी पालकाचे नियमितपणे सेवन केले पाहिजे. कारण पालकामध्ये जीवनसत्वे, खनिजे आणि अल्फा लिपोइक आम्ल मोठ्या प्रमाणात आढळते. यामुळे शरिरातील ग्लूकोजचे प्रमाण कमी करण्यास मदत करते.

कॅन्सरवर इलाज – पालकात आढळणाऱ्या उच्च प्रतीच्या फ्लेव्होनॉइड्स आणि कॅरोटीनोइड्समूळे शरीराच्या प्रतिकारशक्तीत वाढ होण्यास मदत होते. संशोधकांच्या मते, कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराची तीव्रता कमी करण्याचे कामदेखील पालक करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *