महाराष्ट्रात तुरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. राज्यासाठी खरीप हंगामातले तुरीचे पीक अत्यंत महत्त्वाचे आहे. बऱ्याचदा अनियमित पावसाने आणि हवामानातील बदलाने तुरीच्या रोपांचे नुकसान होते किंवा उत्पादन कमी होते. अशा परिस्थितीत उशीर झालेल्या काळात किंवा खंड पडलेल्या काळात तुरीची रोपे तयार करून त्यांची पुन्हा लागवड केल्यास उत्पादन वाढवणे शक्य होते.
सुरुवात कशी करावी ?
सिंचनाची थोडी सोय असल्यास तुरीची रोपवाटिका तयार करावी
रोपासाठी १५ X ७ सेंटीमीटर आकाराच्या काळ्या पॉलिथिन पिशव्या वापराव्यात पहिल्या पावसानंतर शेत नांगरून तयार ठेवावे
पाऊस पडण्याचा अंदाज घेऊन ३० दिवसांच्या रोपांची लागवड करावी
रोप लागवडीची पद्धत:
१५ X ७ सेंटीमीटर आकाराच्या काळ्या पॉलिथिन पिशवीत रोपे लावावीत
पिशव्यांना ४ छिद्रे पाडून घ्यावीत जेणेकरून जास्तीच्या पाण्याचा निचरा होईल
पिशव्यांमध्ये माती आणि शेणखत यांचे प्रमाण सारखे ठेवावे
१००० पिशव्यांमागे १ किलो युरिआ मातीत मिसळून घ्यावा
पिशवीच्या नेमक्या मध्यावर ३ ते ४ सेंटीमीटर खोल अंतरावर बिया रुजवाव्यात
रोपे सावलीत (शेडनेट किंवा झाडाची सावली) ठेवावीत. त्यांना २-३ दिवसांनी पुरेसे पाणी द्यावे
वाण कोणता निवडावा?
मराठा कृषिविद्यापीठाने सुचवलेले BSMR- ७३६ आणि BSMR-८५३ हे वाण पुन्हा करण्यात येणाऱ्या लागवडीसाठी योग्य आहे
BSMR- ७३६ हे वाण पाच ते सहा महिन्यात पूर्ण वाढते. वांझ आणि मर रोगाशी लढण्याची ताकद यात असून तांबड्या रंगाचे भरीव दाणे याला येतात
BSMR- ८५३ हे वाण देखील पाच ते सहा महिन्यात पूर्ण वाढते. वांझ आणि मर रोगाशी लढण्याची ताकद यात असून पांढऱ्या रंगाचे भरीव दाणे याला येतात
पुनर्लागवड केल्यावर काय काळजी घ्याल ?
पुनर्लागवड केल्यानंतर जुने फुटवे जाऊन नवे फुटवे १०-१२ दिवसात येतात
त्यामुळे रोपांना नियमित पाणी द्यावे. पाऊस असल्यास पाण्याची गरज नसते