बहुगुणी तुळशीचे प्रकार

यापूर्वी आपण तुळशीचे आरोग्यासाठीचे एकूण फायदे वाचले. वेगवेगळ्या प्रदेशात तुळशीला वेगवेगळी नावं पडलेली आहेत. तुळशीच्या जगभर अनेक प्रजाती आहेत. त्यातील बहुतेक प्रजाती Ocimum या वंशात मोडतात. इंग्रजीत सर्व तुळशींना सरसकटपणे बेसिल (Basil) या नावाने संबोधले जाते, असे आपण यापूर्वीच्या लेखात वाचले आहेच.  पण तुळस म्हणजे हिरव्यागार पानांचं, सुवासिक रोपटं जरी डोळ्यापुढे येत असलं तरीही तुळशीचेही अनेक प्रकार आहेत बरं का.. शहरात राहणाऱ्या वनस्पतीप्रेमींना किंबहुना गावातल्याही कित्येक लोकांना तुळशीचे प्रकार माहित नसावेत, हे गृहित धरून आपण या लेखात तुळशीचे प्रकार आणि त्यांचे गुणधर्म पाहणार आहोत.

तुळशीचे विविध प्रकार आणि त्यांचे औषधी गुणधर्म –

कृष्ण तुळस –

या प्रकारातल्या तुळशीचे खोड, पाने व मंजिऱ्या काही प्रमाणात गडद जांभळ्या रंगाच्या असतात. उन्हात वाढलेल्या व जुन्या झाडांमध्ये हा रंग जास्त ठळकपणे उठून दिसतो. याच तुळशीला ‘काळी तुळस’ असेही म्हटले जाते. हिची पाने खाल्ल्याने सर्दी, खोकला, ताप यापासून लवकर आराम मिळतो.

राम तुळस –

राम तुळस ही मोठ्या पानांची, उंच व रानटी तुळस आहे. हिच्या पानांना लवंगेसारखा वास येतो. पोटाच्या विकारांसाठी ही वनस्पती उपयुक्त आहे. हिला ‘लवंगी तुळस’ असेही संबोधले जाते.

कापूर तुळस –

या तुळशीच्या पानांना कापराचा सुंगंध येतो. हिच्या तेलामध्ये 60 ते 80 टक्के कापराचे प्रमाण असते. सर्दी, कफ, खोकला यावर कापूर तुळस गुणकारी ठरते. हर्बल टी बनवण्यासाठी या प्रकारची तुळस वापरली जाते.

सब्जा तुळस –

आपल्याकडे सब्जाचे झाड खास त्याच्या बियांसाठी लावले जाते. शरीराला थंडावा मिळण्यासाठी उन्हाळ्यात सब्जा फार महत्वाचा वाटतो. या प्रकारातल्या तुळशीची पानं व बिया दुधात वा पाण्यात घालून प्यायल्याने उष्णता कमी होते.

वन तुळस –

ही तुळस विशेष औषधी असून हिचा वासही खूप स्ट्रॉंग म्हणजेच तीव्र असतो. या पानांचा चोथा किंवा चूर्ण  त्वचा विकारांसाठी गुणकारी ठरते.

रान तुळस –

या तुळशीला ‘औषधाची राणी’ असं म्हटलं जातं. हिच्या योग्य प्रमाणातील सेवनामुळे सर्दी खोकल्यापासून कर्करोगासारख्या दुर्धर रोगांवर काही प्रमाणात इलाज साधता येतो.

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *