उत्पादन सुधारण्यासाठी काही झटपट शेतीविषयक टिप्स (भाग-२)

भारतामध्ये शेती ही कायमच केंद्रस्थानी राहिली आहे आणि ते अर्थव्यवस्था चालवणारे चाक आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपासून भारताची अर्थव्यवस्था ही शेतीप्रधान आहे. शेती व शेतकरी यांना मोठ्या प्रमाणात चालना देण्याचा प्रयत्न आपण करत आलो आहोत. आजच्या जगातही शेती हा सर्वांत प्रशंसनीय व्यवसायांपैकी एक समजला जातो. उत्पादन वाढवण्यासाठी योग्य त्या साधनांच्या वापराहून अधिक निर्णायक शेतकऱ्यासाठी दुसरे काहीही नाही. अनेक आयाम, बाजू आणि मुद्दे यांवर उत्पादन अवलंबून असले तरी, मोठ्या प्रमाणात पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील अशी काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. काल आपण पैशाचे व्यवस्थापन, नियोजन व संशोधन, उत्पादनासाठी परिस्थितींचा योग्य वापर, पाणी निचऱ्याचे योग्य व्यवस्थापन याबाबत टिप्स घेतल्या. आज आपण आणखी उपयुक्त टिप्स जाणून घेणार आहोत. संसाधनांचा सर्वोत्तम वापर करून उत्पादन वाढवण्यासाठी या काही झटपट व सहज अमलात आणण्याजोग्या टिप्स आहेत:

कृषी क्षेत्रातील अन्य संबंधितांशी दीर्घकालीन नातेसंबंधांचे भक्कम नेटवर्क उभारणे: कोणत्याही अन्य कार्यक्षेत्राप्रमाणेच कृषी क्षेत्रातही उपक्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांसोबत दृढ नातेसंबंध प्रस्थापित करणे व राखणे अत्यावश्यक आहे. विक्रेते, कृषी संशोधक, अन्य शेतकरी तसेच बियाणी, खते व कृषी उपकरणांसारख्या कच्च्या मालाच्या पुरवठादारांसोबत भक्कम नातेसंबंध तयार करणे ही एक उत्तम पद्धत आहे. आपल्या कामाशी निगडित नवीन संशोधने जाणून घेत राहण्यासाठी हा घटक निर्णायक आहे आणि यामुळे आपले कौशल्य अधिक विस्तृत होते. आपल्या कामावर घट्ट पकड मिळवण्यास तसेच आपली व्याप्ती विस्तारण्यास व वाढवण्यास आवश्यक ते संपर्क यातूनच तयार होतात. विविध संबंधितांमधील परस्परविश्वास शेतीतील एकंदर कामाला खरोखर चालना देऊ शकतो. नातेसंबंध जोडण्यासाठी वेळ व प्रयत्नांची गरज भासते पण दीर्घकाळात हे नातेसंबंध फलदायी ठरतात.

तण काढणे लवकर सुरू करणे व वारंवार काढणे: अनेक शेतांमध्ये माजलेले तण हा प्रमुख कच्चा दुवा तसेच अडथळा झालेला असतो आणि ही समस्या सुरुवातीलाच हाताळली नाही, तर याचा परिणाम शेतावर तसेच उत्पादनावर होतो. तण आक्रमकरित्या वाढते आणि शेतकरी जी पिके घेण्याच्या प्रयत्नांत असतात, त्यांना आवश्यक पोषके तण शोषून घेते. तण काढून टाकले पाहिजे आणि तण काढण्यास प्रारंभिक टप्प्यावर सुरुवात केली पाहिजे. शक्य तेवढ्या वारंवार तण काढून टाकले पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्यांना शेताचे निरीक्षण वारंवार तसेच सक्रियपणे केले पाहिजे, जेणेकरून तण माजत असल्याचे लगेच लक्षात येईल. असे झाल्यास तणाची समस्या मोठी तसेच नियंत्रणाबाहेरील होण्यापूर्वीच ते काढून टाकणे शक्य होईल.

मातीच्या संरक्षणासाठी तसेच अधिक उत्पन्न घेण्यासाठी आंतरपिके घेणे: मातीची धूप हे लागोपाठच्या पिकांचे उत्पादन कमी करणारा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ही समस्या दूर करण्याची प्रभावी तसेच स्वयंप्रेरित पद्धत म्हणजे एकाच प्रकारची पिके न घेता आधुनिक व पारंपरिक अशी आंतरपीके घेणे, पर्माकल्चर तसेच कृषी-वनीकरण होय. आंतरपीक पद्धतीमुळे एकाच हंगामावरील अवलंबित्व कमी होते, एकच पीक घेऊन मिळेल त्याहून अधिक उत्पन्न शेतकऱ्याला मिळते. यामुळे शेतकऱ्यांना हंगाम नसलेल्या काळातही उत्पन्न मिळवणे शक्य होते.  

या टिप्स कोणत्याही मातीत तसेच पिकासाठी उपयोगात आणण्याजोग्या आहेत. अवघे जग अन्नासाठी शेतकऱ्यावर अवलंबून असते, तर शेतकरी उत्पादनासाठी त्याच्या शेतावर अवलंबून असतो. म्हणूनच उत्पन्न उत्पादनाची खातरजमा करण्यासाठी तसेच भरघोस सुगीचा मोबदला मिळवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणे कधीही उत्तम ठरते.

लेखक – राजीव कुमार- प्रमुख- कृषी विक्री (देशांतर्गत व्यवसाय), बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड (बीकेटी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *