उत्पादन सुधारण्यासाठी काही झटपट शेतीविषयक टिप्स

भारतामध्ये शेती ही कायमच केंद्रस्थानी राहिली आहे आणि ते अर्थव्यवस्था चालवणारे चाक आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपासून भारताची अर्थव्यवस्था ही शेतीप्रधान आहे. शेती व शेतकरी यांना मोठ्या प्रमाणात चालना देण्याचा प्रयत्न आपण करत आलो आहोत. आजच्या जगातही शेती हा सर्वांत प्रशंसनीय व्यवसायांपैकी एक समजला जातो. उत्पादन वाढवण्यासाठी योग्य त्या साधनांच्या वापराहून अधिक निर्णायक शेतकऱ्यासाठी दुसरे काहीही नाही. अनेक आयाम, बाजू आणि मुद्दे यांवर उत्पादन अवलंबून असले तरी, मोठ्या प्रमाणात पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील अशी काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. संसाधनांचा सर्वोत्तम वापर करून उत्पादन वाढवण्यासाठी या काही झटपट व सहज अमलात आणण्याजोग्या टिप्स आहेत:

पैशाचे व्यवस्थापन करणे: उत्पन्न व खर्च यांसह प्रत्येक आर्थिक बाजूवर घट्ट पकड असणे खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या शेतावरील उत्पन्न व खर्च यांच्याशी संबंधित सर्व पावत्या, कागदपत्रे जपून ठेवा आणि संसाधनांशी संबंधित प्रत्येक खर्चाची व्यवस्थित नोंद ठेवून या नोंदीही जपून ठेवा. तुमच्या आर्थिक प्रगतीचा माग ठेवण्यासाठी आणि चांगल्या उत्पादनाची खात्री करण्यासाठी आवश्यक ते खर्च समजून घेण्यासाठी हे अत्यावश्यक आहे. याशिवाय या दस्तावेजांच्या माध्यमातून आपण सर्वाधिक उत्पन्न देणारे महिने समजून घेऊ शकतो आणि पैशाच्या ओघाची जुळणी त्याप्रमाणे करू शकतो.

नियोजन व संशोधन करणे: शेती हा खूप समाधान देणारा व्यवसाय आहे पण यासाठी विस्तृत नियोजन व कार्यान्वयनाची आवश्यकता भासते, शिवाय याला संशोधनाची जोडही द्यावी लागते. अलीकडील प्रवाह, शास्त्रशुद्ध पद्धती यांबाबत संशोधन करणे महत्त्वाचे आहे तसेच आपले उत्पन्न वाढवू शकतील अशा बाबींचे संशोधन करत राहणेही गरजेचे आहे. सर्वोत्तम परिणाम पाहिजे असेल, तर मृदेच्या मोजमापापासून ते खतांच्या अचूक प्रमाणातील वापर व मशागतीपासून प्रत्येक बाबीची खातरजमा केली पाहिजे. शेती ही केवळ आर्थिक संधी नाही, तर हा अखेरीस अनेकविविध प्रक्रियांचा अंतर्भाव असलेला ऑपरेशनल व्यवसाय आहे हे समजून घेणे ही यशस्वी शेतीची गुरूकिल्ली आहे.

उत्पादनासाठी परिस्थितींचा योग्य वापर करणे: पिकाची निरोगी वाढ ही निरोगी वातावरणाशी थेट निगडित आहे. वारा, पाणी, माती, पोषके यांसारख्या नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करणे दर्जेदार पीक घेण्यासाठी उपयुक्त ठरते. बहुतेक शेतकरी आजुबाजूच्या परिसंस्थेवर अवलंबून राहतात. निरोगी पीके घेण्यासाठी ही पद्धत अधिक चांगली समजली जाते.

पाणी निचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे: पीक वाचण्यासाठी व पुरेशा उत्पादनासाठी पाणी व्यवस्थापन हा अत्यंत निर्णायक मुद्दयांपैकी एक आहे. उत्पादन अधिकाधिक वाढवण्यात हा मुद्दा अत्यावश्यक भूमिका पार पाडत आहे. पिकांना पुरेसे पाणी मिळणे तर आवश्यक आहेच पण अतिरिक्त पाणी घातले जाणार नाही याची नीट अभ्यास करून खात्री केली पाहिजे. शेतावर पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रणाली विकसित केल्यास पाणी साचून राहणे आणि मातीत क्षार निर्माण होणे (सॅलिनायझेशन) आदी बाबी टाळल्या जातात. पर्यायाने मृदा संवर्धन होते. यामुळे जमीन रेताड व पेरणीसाठी प्रतिकूल होणेही टाळले जाते. (क्रमश:)

लेखकराजीव कुमार- प्रमुख- कृषी विक्री (देशांतर्गत व्यवसाय), बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड (बीकेटी)

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *