या शेतकऱ्याने लादी पद्धतीने कमी श्रमात भातशेती आणली नफ्यात

रोपणी यंत्राची कमतरता असल्याने शिवाय अनेक शेतकऱ्यांना मनुष्यबळाअभावी मोठ्या प्रमाणात भात लागवड शक्य होत नाही. भात शेतीतल्या अडचणी बघता या शेतीला पर्यायी पिक नाही. परदेशात आधुनिक भातशेतीचं तंत्रज्ञान सहज उपलब्ध आहे परंतू ते तंत्रज्ञान इकडच्या अनेक शेतकऱ्यांना परवडणारे नाही. यावर उपाय म्हणून आधुनिक शेतीच्या मार्गाने सतत प्रयत्न करत अनेक शेतकऱ्यांना एकत्र आणत वाडा तालुक्यातील शेतकरी अनिल पाटील यांनी तोट्यात जाणारी भातशेती नफ्यात आणून दाखवली आहे. रोपणीसाठी पारंपारीक पद्धतीचाच अवलंब करत लादी पद्धतीने भातशेती नफ्यात आणून दाखवण्याची किमया त्यांनी केली आहे. 

पारंपरिक भात शेती मध्ये लागवडीत ६४% खर्च हा मजुरीवर होत असतो. हा खर्च कमी व्हावा म्हणून यातील पहिला टप्पा हा की रोप वाटीकेत भात पिकांची लादी तयार करणे. ज्या मध्ये पेरणी, उखळणीची अर्धी मेहनत व खर्च वाचू शकतो. त्या नंतर दुसरा टप्पा म्हणजे यांत्रिकीकरणाने लागवड करणे. पण रोपणी यंत्र खूप कमी ठिकाणी उपलब्ध आहेत. तरीही रोपणी यंत्राशिवाय या भात पिकांच्या लाद्यांनी पारंपारिक पद्धतीने लागवड करणे सहजच शक्य आहे. साधारणतः एका एकरला ८० लाद्या लागतात. ५० रुपये प्रति लादी या दराने लाद्या अनिल पाटील, सांगे ता. वाडा यांनी  उपलब्ध करून दिल्या आहेत.

कृषिभूषण असलेले अनिल पाटील याविषयी म्हणतात, ‘भातशेतील्या अडचणी बघता भातशेतीला पर्यायी पीक नाहीये. म्हणून त्याच्यामध्येच आपल्याला प्रगती करायला हवी, नवीन शोध घ्यायला हवा हे माझ्या लक्षात आलं. बाहेर देशात अशाप्रकारे यांत्रिकीकरण झालं आहे आणि हे यांत्रिकिकरण करण्यामागे तीन सलग वर्ष मी याच्यासाठी सतत धडपडत होतो. हे प्रत्यक्षात उतरवताना आमच्या वैतरणा ग्रुपचे सदस्य आणि शेतकरी यांनी सहकार्य दिलं. कृषी विभागाने आम्हाला चांगली गटशेतीची योजना दिली आणि गटशेतीच्या माध्यमातून वैतरणा शेतकरी उत्कर्ष मंडळ यांच्या माध्यमातून आम्ही हा प्रकल्प केला. यामागे उद्देश एकच आहे की भातशेतीच्या चिखलात अडकत चाललेला जो शेतकरी आहे त्याला थोडा तरी दिलासा कसा मिळेल, आणि आपली भातशेती चांगल्या प्रकारे कशी होऊ शकेल. थोडक्यात 64% मजुरीवर होणारा खर्च होतो तो कमी कसा करता येईल हा आमचा प्रयत्न  आहे. तो 30 टक्क्यांवर आला तर उरलेले टक्के फायद्यात कसे येतील हा याच्या मागे उद्देश आहे. या उपक्रमाची दखल कृषिमंत्र्यांनी देखील नुकतीच घेतली आहे. 

संपर्क – 9970978700

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *