येऊरचं जंगल वाचवण्यासाठी तरुणांची गाण्याच्या माध्यमातून साद !

कोविडच्या पार्श्वभूमीवर येऊर एन्व्हायरमेंट सोसायटीच्या च्या कार्यकर्त्यांनी सामाजिक भान राखत येऊरच्या गस्तीमध्ये भाग न घेण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. परंतु गेल्या ५ वर्षांच्या मोहिमेत खंड पडू नये म्हणून अतिशय अभिनव पद्धतीने पर्यवरण संवर्धन व संरक्षणाच्या जनजागरणासाठी तसेच तरुणाईचे ध्यान या गोष्टींकडे आकर्षित करण्यासाठी एक रॅप गाणे प्रसिद्ध केले आहे. ‘येऊर की आवाझ’ असे गाण्याचे नाव असून त्याची निर्मिती हिरण्यगर्भ सेवा संस्थेने केली आहे. या गाण्याचे अधिकृत लोकार्पण जागतिक कीर्तीचे कलाकार, कवी, संगीत दिग्दर्शक पियुष मिश्रा यांच्या तर्फे करण्यात आले. गायक ऋतुराज सावंत रॅपर आहेत तर आदित्य सालेकर (डायरेक्टर), मयुरेश हेंद्रे (एडिटर), अक्षय केनी (कॅमेरा आणि सिनेमतोग्रफी) , पार्थ चव्हाण (एरियल सिनेमतोग्रफी) , अक्षय मांधरे (गो प्रों. सिनेमतोग्रफी), सुमेध अडसूळ (मिक्स & मास्टर), आदित्य सालेकर आणि मयुरेश हेंद्रे (विल्लाइफ फुटजेस), प्राची शेट्ये, विनय जैस्वाल, प्रिन्स डिसुझा, अजिंक्य जाधव यांचे महत्वाचे योगदान आहे. 

याचबरोबर ‘येऊर -ग्रीन लंग्स ऑफ ठाणे’ या माहितीपटाची सुद्धा निर्मिती हिरण्यगर्भ सेवा संस्था ह्यांच्या कडून करण्यात आली आहे. येऊर परिसरातील समस्या आणि त्यावर उपाय शोधत येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीच्या माध्यमातून गेले पाच वर्षे सुरू असलेले उपक्रम असे या महितीपटाचे स्वरूप आहे. प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते स्टॅलिन दयानंद, रोहित जोशी, अपूर्वा आगवण तसेच येऊर येथील वायुसेना दलातील निवृत्त कॅप्टन तरुण गौतम तसेच स्थानिक आदिवासी किशोर म्हात्रे, अनिता वळवी आणि इतर स्थानिक लकप्रतिनिधींनी याविषयीच्या भावना महितीपटात विषद केल्या आहेत. या महितीपटाची निर्मिती हिरण्यगर्भ सेवा संस्था ह्यांनी केली असून ठाणेकर तरुणाई आदित्य सालेकर ह्यांनी ह्या डॉक्युमेंटरी ला डायरेक्ट केले आहे व मयुरेश हेंद्रे यानी त्याला एडीट केले आहे आहे. दोन्ही आदित्य आणि मयुरेश Yeoor Environmental Society चे  संस्थापक सदस्य आहेत व मागच्या ५ वर्षा पासून सातत्याने येऊर साठी नावीन्य पूर्ण उपक्रमत सहभाग घेण्यात साथ देत आहेत.

येऊर एन्व्हायरमेंट सोसायटीच्या सोबत हिरण्यगर्भ सेवा संस्था, होप, वण शक्ती, वाइल्डलाइफ वेलफेअर असोसिएशन, म्युज, Aarey Conservation Group, Earth Kids Humanity Foundation, Paryavaran Dakshata Manch, सेवेचे ठायी तत्पर, Let India breath, Aarey Forest, Thane Matadata Jagran Abhiyan, Empower Foundation, Universal Reach Foundation, We the People, Artist with Animals, Aarey Forest या संस्थांचे कार्यकर्ते मिळून हा उपक्रम राबवत आहेत.  अशा प्रकारचे उपक्रम YES नियमीतपणे करत असतं. या कार्यक्रमांना जनसहभागाची गरज असतेच. येऊर एन्व्हायरमेंट सोसायटीच्या निसर्गविषयक कार्यक्रमांमधे जरुर सहभागी होण्याचं आवाहन संस्थेचे समन्वयक रोहीत जोशींनी केलंय. 

येऊर एन्व्हायरमेंटल सोसायटीचा संपर्क क्रमांक – 9819769069 

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *